होमपेज › Satara › रस्त्यांसाठी सात कोटी निधी मंजूर

रस्त्यांसाठी सात कोटी निधी मंजूर

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 8:20PMसणबूर : वार्ताहर  

पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात पवनऊर्जा प्रकल्पाच्या अवजड यंत्रसामुग्रीमुळे नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची पुर्नंबांधणी करणेकरीता तालुक्यातील 6 रस्त्याच्या कामांना  7 कोटी  49 लक्ष  4 हजार रुपयांचा निधी ऊर्जामंत्री यांचे आदेशावरुन राज्यस्तरीय पवनऊर्जा प्रकल्प रस्ते दुरुस्ती समितीने मंजुर केला. सदरचा निधी तात्काळ वितरीत करुन सदरच्या रस्त्यांची कामे तात्काळ सुरु करण्याच्या सुचना महाऊर्जा नियामक मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या असल्याची माहिती आ. शंभूराज देसाईंनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

 पत्रकात म्हटले आहे की, डोंगर पठाराकडे जाणा-या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्या अखत्यारितील इतर जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्गावरील रस्त्यांवरुन अवजड यंत्रसामुग्रींची वाहतूक या पवनऊर्जा कंपन्यांकडून करण्यात आल्याने चांगल्या दर्जाचे करण्यात आलेल्या रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांसाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देणेबाबत आ. देसाई यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, पुणे यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला. तत्कालीन अपारंपारिक ऊर्जा मंत्री यांचेकडे खराब झालेल्या रस्त्यांच्या कामांकरीता शासनाच्या ऊर्जा विभागाकडून व महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण, पुणे यांचेकडून प्रति किलोमीटर  10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करावा अशी आग्रही मागणी करुन ती तत्कालीन अपारंपरिक मंत्री विनय कोरे यांचेकडून मान्य करुन घेतली होती. त्यानुसार मागील आर्थिक वर्षात तालुक्यातील मोरणा, ढेबेवाडी विभागातील अशाप्रकारे नादुरुस्त झालेल्या रस्त्याच्या कामांची पुर्नंबांधणी करणेकरीता निधी मंजूर करुन आणण्यात यश मिळाले. 

सन 2017 -18 या आर्थिक वर्षात अशाच प्रकारे निधी मिळावा याकरीता प्रस्ताव सादर केले होते त्यानुसार येथील 6 रस्त्यांच्या कामांना 6 कोटी 6 लक्ष 44 हजार रुपयांच्या निधीची गरज असल्यामुळे सदरचे प्रस्तावित कामांच्या रक्कमेस शासनाची मंजुरी घेवून निधी वितरीत करावा असे महाऊर्जा नियामक मंडळाने सूचित केले आहे. याही कामांस शासनाकडून मंजुरी देण्याचे आश्‍वासन शासनाचे ना. बावनकुळे यांनी दिले आहे. 

दरम्यान सहा कामांना एकूण 7 कोटी 49 लक्ष 4 हजार रुपयांचा निधी मंजुर केला आहे.  यामध्ये आंबेघर तर्फ मरळी ते पळशी रस्ता दुरुस्ती करणेकरीता 1 कोटी 52 लक्ष 72 हजार, जुळेवाडी फाटा  वाल्मिकी रस्ता ते धडामवाडी रस्तादुरुस्ती करणे  लक्ष  हजार, निवी ते कसणी रस्तादुरुस्ती करणे 51 लक्ष 94 हजार, महिंद ते सळवे रस्ता ग्रामा 318 दुरुस्ती करणे 1 कोटी 13 लक्ष 39 हजार, निवी ते कसणी रस्ता 55 लक्ष 6 हजार व कसणी निगडे ते माईंगडेवाडी रस्ता 3 कोटी 27 लक्ष 43 हजार रुपये असे एकूण 7 कोटी 49 लक्ष 4 हजार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. तर जुळेवाडी फाटा ते वाल्मिकी रस्ता इजिमा 137 किमी 15 किमी रस्त्याच्या कामांस शासनस्तरावर मंजुरी देण्यात येणार असून याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.