Sat, Mar 23, 2019 16:48होमपेज › Satara › लाचप्रकरणी ‘एमआयडीसी’चा क्लार्क ‘जाळ्यात’

लाचप्रकरणी ‘एमआयडीसी’चा क्लार्क ‘जाळ्यात’

Published On: Dec 21 2017 1:51AM | Last Updated: Dec 21 2017 12:18AM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

एमआयडीसीमधील प्लॉटवर सर्व्हिस चार्जची थकबाकी कमी केल्याच्या मोबदल्यात व त्या प्लॉटवरील नो ड्युजचे प्रमाणपत्र देण्यासाठी 13 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सातारा एमआयडीसी कार्यालयाचा क्लर्क महादेव गोविंद पाटील (वय 42, सध्या रा. एमआयडीसी, सातारा, मूळ रा. अमरापूर, ता. कडेगाव, जि.सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. दरम्यान, एमआयडीसी कार्यालयातील गेल्या 15 दिवसांतील ही दुसरी कारवाई असून दोन्हीमधील तक्रारदार एकच आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार हे सातारा परिसरातील आहेत. त्यांना सातारा एमआयडीसीमधील प्लॉटवर सर्व्हिस चार्जची थकबाकी कमी करायची होती. तसेच त्या प्लॉटवरील नो ड्युजचे प्रमाणपत्रही पाहिजे होते. यासाठी तक्रारदार हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, सातारा कार्यालयातील क्लर्क महादेव पाटील यांना भेटले. कामाबाबतची माहिती दिल्यानंतर पाटील याने ते काम करण्यासाठी  15 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

तक्रारदार यांनी दि. 29 नोव्हेंबर रोजी सातारा एसीबीकडे तक्रार दिली होती. त्याची पडताळणी केली असता महादेव पाटील याने 13 हजार रुपयांची लाच  मागितल्याचे स्पष्ट झाले. लाचेची रक्कम स्वीकारली जात नसल्याने अखेर बुधवार दि. 20 रोजी पाटील याला अटक करण्यात आली असून सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा एसीबीने दि. 6 डिसेंबर रोजी याच विभागात 15 हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी क्लर्क प्रवीण मरळे याच्यावरही ट्रॅप केला आहे. 15 दिवसांत दोन कारवाई झाल्याने एमआयडीसी कार्यालय लाचखोरीत बरबटलेले असल्याचे समोर आले आहे. पोलिस उपअधिक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बयाजी कुरळे, पोनि आरिफा मुल्ला, पोलिस हवालदार सपकाळ, बनसोडे, शिंदे, काटवटे, अडसुळ, कर्णे, ताटे, काटकर, राजे, खरात, जमदाडे, कुंभार, माने या पोलिसांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
दरम्यान, सातारा शहरासह जिल्ह्यात कोणत्याही शासकीय कार्यालयात लाचेची मागणी झाल्यास 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.