Mon, Sep 23, 2019 04:06होमपेज › Satara › लोणंद-फलटण डेमू सेवेस प्रारंभ 

लोणंद-फलटण डेमू सेवेस प्रारंभ 

Published On: Sep 11 2019 5:59PM | Last Updated: Sep 11 2019 4:55PM
लोणंद : प्रतिनिधी 

गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या लोणंद ते फलटण रेल्वेमार्गावरील डेमू सेवा आजपासून (दि.11) सुरू झाली. आज दुपारी ३ वाजता या डेमू गाडीचा फलटण येथून शुभारंभ झाला. लोणंद ते फलटण हे अंतर २६ किलोमीटर एवढे आहे. या मार्गावर तरडगाव, सुरवडी, फलटण अशी तीन रेल्वे स्टेशन आहेत. या मार्गांवर दिवसातून दोन वेळा  रेल्वे गाडी धावणार आहे.