Wed, Jan 29, 2020 23:52होमपेज › Satara › लोणंदला दोन गटांत तुंबळ हाणामारी

लोणंदला दोन गटांत तुंबळ हाणामारी

Published On: Dec 27 2017 1:21AM | Last Updated: Dec 26 2017 11:18PM

बुकमार्क करा

लोणंद : प्रतिनिधी

लोणंद येथील दोन गटांत  बांधकाम करण्याच्या व कमिशनचे पैसे दिले नसल्याच्या कारणावरून लाकडी दांडके, लोखंडी पाईप व दगडाने झालेल्या मारामारीत तीन जण जखमी झाले. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून लोणंद पोलिसांत दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

लोणंद येथील इंदिरानगर येथे सोमवारी दुपारी 12.30 च्या सुमारास शेखर ऊर्फ राजू यशवंत खरात (रा. लोणंद) हे त्यांच्या जागेची पाहणी करण्यास गेले. त्यावेळी शेजारी बांधकाम सुरू होते. तेथे काम करणार्‍या कामगारांना त्यांनी काम थांबवण्यास सांगितले असता, महेश शालिग्राम यादव, अतिश शालिग्राम यादव व दीपक पवार (सर्व रा. लोणंद) यांनी शेखर खरात यांना शिवीगाळ व दमदाटी करून हाताने, दगडाने तसेच लाकडी दांडक्याने चेहर्‍यावर मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद शेखर खरात यांनी लोणंद पोलिसांत दिली आहे. 

दुसर्‍या फिर्यादीत महेश यादव यांनी म्हटले आहे की, सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास लोणंद-सातारा रोडलगत असणार्‍या हॉटेल विश्‍वजवळ महेश यादव, अतिश यादव व दीपक पवार मोटारसायकलवरून निघाले होते. यावेळी बंटी खरात, शेखर ऊर्फ राजू खरात, सनी खरात, पप्पू साळवी, बबलू कच्छी, सागर घाडगे, सागर रजपूत (सर्व रा. लोणंद) यांनी त्यांना अडवले व शेखर खरात यांचे कमिशनचे पैसे का दिले नाही, असे विचारून लाकडी दांडके व लोखंडी पाईपने मारहाण केली. तसेच शिवीगाळ दमदाटी केली. यामध्ये अतिश यादव गंभीर जखमी झाले आहेत.