लोणंद : प्रतिनिधी
उसने दिलेले पैसे परत दिले नाही व राजकारणात भाग घेतो या कारणावरून युवकांच्या दोन गटांत झालेल्या मारामारीत एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणात लोणंद पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीनुसार 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोणंद येथील बाजार तळावर शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास रोहन विलास धायगुडे हा मित्रांशी गप्पा मारत बसला होता.
त्यावेळी अमित शिवाजी गोवेकर, रणजित बाळासाहेब गोवेकर, प्रतीक विलास क्षीरसागर, नवनाथ दशरथ गोवेकर, मनोज मोहन कोकरे, अजित शिवाजी गोवेकर (सर्व रा. कोरेगाव, ता. फलटण) यांनी दारू पिऊन तु तुझा मित्र कुमार कर्णवर याला पाठीशी घालून अमित गोवेकर यांचे पैसे देण्यास विरोध करतो, असे म्हणून रोहन धायगुडे याला मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली असल्याची तक्रार धायगुडे याने दिली आहे.
तर अमित गोवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास लोणंद (ता. खंडाळा) गावच्या हद्दीत ममता स्वीट होमच्या इथे अमित शिवाजी गोवेकर हा राजकारणात भाग घेतो. याचा राग मनात धरून हर्षवर्धन आनंदराव शेळके, विक्रम धायगुडे, भरत शेळके, संग्राम आनंदराव शेळके, मित्तल शहा सर्व रा. लोणंद यांनी मारहाण केली.