Sat, Jan 19, 2019 13:43होमपेज › Satara › सेंट्रल रेल्‍वेकडून २०० कुटुंबांना जागा खालीची नोटीस

सेंट्रल रेल्‍वेकडून २०० कुटुंबांना जागा खालीची नोटीस

Published On: Aug 28 2018 8:28PM | Last Updated: Aug 28 2018 8:28PMलोणंद : प्रतिनिधी 

लोणंदच्या रेल्वे स्टेशन नजीकच्या सरकारी जागेवर झोपड्‍या बांधुन राहणार्‍या दोनशे कुटुंबांना सेंट्रल रेल्‍वेकडून जागा खाली करण्याची नोटीस देण्यात आली आहे. यामुळे येथील दोनशे कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.

लोणंद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, एस.टी. स्टॅन्ड पाठीमागील बाजू, डोंबार वस्ती, वडार समाज वस्ती, घिसाड समाज वस्ती या भागात गेली अनेक वर्षे लोक झोपडीवजा घरात राहात आहेत. हातावर पोट असणार्‍या येथील लोकांसाठी या झोपड्‍या म्‍हणजेच काय ते निवार्‍याचे साधन आहे. मात्र रेल्‍वेकडून  या भागातील नागरिकांना देण्यात आलेल्‍या  नोटीसीं मुळे  हातावर पोट असणाऱ्या गरिबांच्या  डोक्यावरील छपराचा आधार जाणार या भीतीने त्‍यांची अक्षरक्षा झोप उडाली आहे. बेघरांना बेघर करण्याचे काम रेल्वे प्रशासन करीत आहे. ही गरीब कुंटुबे रेल्वे कडून आलेल्या नोटीसा मुळे सैरभैर झाली  आहेत. या संकटातून आमची सुटका करून आमचे घर तोडु नका हो  अशी आर्त हाक देत आहेत . या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक नेत्याबरोबर लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेण्याची गरज .