Fri, Mar 22, 2019 01:59
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › वाढत्या चोर्‍यांमुळे पशुधन धोक्यात

वाढत्या चोर्‍यांमुळे पशुधन धोक्यात

Published On: Aug 01 2018 1:36AM | Last Updated: Jul 31 2018 11:27PMउंडाळेः वैभव पाटील 

कराड दक्षिणच्या डोंगरी विभागात  दिड महिन्यांपासून शेळया,मेंढया  व कोंबडया चोरीचे प्रमाण वाढले असून चोरटे मात्र मोकाट आहेत. कराड दक्षिण विभागात अनेक गावे वाडया-वस्त्यांमध्ये विखुरली आहेत. शेतकर्‍यांची जनावरे ही गावाबाहेर असणार्‍या गोठ्यातच असतात.  

याचाच फायदा घेत जिंती, साळशिंरबे, सवादे, आकाईवाडी, तुळसण, भरेवाडी, भुरभुशी आदी ठिकाणी शेळया, कोंबड्या चोरून नेण्याचे प्रकार गेल्या एक-दोन महिण्यापासून सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी जिंती ता. कराड येथील पोष्ट मास्तर अशोक पाटील यांच्या आकाईवाडी फाटयावरील जनावरांच्या शेडमधून बकरी व दहा कोंबड्या अज्ञातांनी चोरून नेल्या. सवादे येथे निवृत्‍ती मारूती थोरात यांच्या 5 शेळ्या चोरून नेल्या तर भिकाजी धोंडीराम थोरात यांच्या वस्तीवरून एक बोकड व   कोंबडया चोरून नेल्या.

साळशिरंबे येथील दादा यांच्या शेडमधून शेळी चोरून नेली.  काहीनी पोलिसात तक्रार केली मात्र पोलिसांनी याकडे गांभीर्याने न पाहता तुम्हीच शोधा असे सुनावले. काही महिन्यापूर्वी कराड तालुक्यात पोलिसांची गस्त होती. त्यामुळे चोरीच्या घटनांना आळा बसला होता. पण काही दिवसांपासून  ही गस्त बंद झाली आहे. येळगाव फाट्यावर गस्त नसते. त्यामुळे विभागात  भुरट्या चोरांचे फावले आहे. पोलिसांनी रात्र गस्त सुरू करावी अशी मागणी जनेतून होत आहे. उंडाळे पोलिस चौकीत कायम स्वरूपी पोलिस कर्मचारी हजर असने अपेक्षित असताना तेथे अपवाद वगळता कर्मचारीच नसतात. तुमची शेळी, कोंबड्या कशा शोधायच्या त्यांच्यावर काय नंबर आहे का असा प्रतिप्रश्‍न पोलिस तक्रारदार यांना करत आहेत.