Thu, Apr 25, 2019 15:26होमपेज › Satara › आईसोबत निघालेली चिमुरडी अपघातात ठार 

आईसोबत निघालेली चिमुरडी अपघातात ठार 

Published On: Dec 03 2017 1:03AM | Last Updated: Dec 02 2017 10:52PM

बुकमार्क करा

भुईंज : वार्ताहर 

आईचे बोट पकडून तिच्यासोबत दुकानामध्ये वेफर्स आणण्यासाठी निघालेली 6 वर्षांची चिमुरडी कारने ठोकरल्याने ठार झाली. वाई-पाचवड रस्त्यावर आसले येथे ही घटना घडली. 

सिद्धी संजय पवार (वय 6, रा. पांडवनगर आसले, ता. वाई) असे मृत चिमुरडीचे नाव आहे. सिद्धी आईसोबत शनिवारी  वेफर्स आणण्यासाठी निघाली होती.वाई बाजूने भरधाव वेगात आलेल्या  कारने (एमएच 11 सीजी 4704)  सिद्धीला जोरदार धडक दिली. त्यामुळे  सिद्धी डांबरी रस्त्यावर मधोमध जाऊन पडली.

पुढे जाऊन कारने पाचवडकडून आलेल्या मोटारसायकललाही धडक दिली. पाठीमागे बसलेल्या महिलेच्या डोक्याला जबर मार लागला. जखमींना तातडीने वाई येथील रुग्णालयात नेण्यात आले; परंतु उपचारापुर्वीच सिद्धी मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विलास नामदेव गायकवाड (रा. पाचवड, ता. वाई) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास स.पो.नि. बाळासाहेब भरणे करीत आहेत.