Sat, Feb 23, 2019 10:11होमपेज › Satara › लिंब-गोवे पुलालगतचे धोकादायक वळण हटवले

लिंब-गोवे पुलालगतचे धोकादायक वळण हटवले

Published On: Mar 09 2018 1:37AM | Last Updated: Mar 08 2018 11:00PMलिंब : वार्ताहर 

.ब - गोवे दरम्यानच्या कृष्णा नदीवरील नव्याने झालेल्या पुलाच्या रस्त्याचा मार्ग अखेर सुकर झाला. दै.‘ पुढारी’च्या वृत्तामुळे प्रश्‍न सुटल्याने परिसरातील ग्रामस्थांनी ‘पुढारी’ला धन्यवाद दिले.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून साकारलेल्या सातारा तालुक्यातील कृष्णा नदीवरील नवीन पूल अयोग्य नियोजनामुळे भविष्यात अपघाताचे टर्निंग पॉईंट  ठरणार होता. पुलाच्या दोन्ही बाजू रस्त्याला योग्य पद्धतीने जोडण्यासाठी ठेकेदार, अधिकारी व परिसरातील स्थानिक नेत्यांमध्ये समन्वय ठेवून पुलाचे काम उदघाटनापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी लिंब गोवे परिसरातील ग्रामस्थ करीत होते. प्रत्यक्षात पुलाचे काम मार्गी लागून पूर्णत्वास गेले होते. मात्र, पुलाच्या दोन्ही बाजू योग्य पद्धतीने जोडल्या न गेल्यामुळे पुलाच्या तोंडावरच धोकादायक वळण निर्माण झाले होते. त्यामुळे हे ठिकाण अपघातप्रवण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा प्रश्‍न ‘पुढारी’ने उचलून धरला. 

याबाबत  ‘लिंब गोवेच्या पुलाजवळ धोकादायक वळण’ या शीर्षकाखाली बातमी प्रसिद्ध करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले. त्यामुळे लिंब गोवे परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, संबंधित शेतकरी व अधिकार्‍यांनी चर्चा करून मार्ग काढला.  पुलाजवळील धोकादायक वळण  काढून योग्य पद्धतीने रस्ता तयार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे  परिसरातील ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.