Sat, Jul 20, 2019 10:53होमपेज › Satara › औषध घेवून परतताना आई ठार; मुलगा जखमी

औषध घेवून परतताना आई ठार; मुलगा जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंब : वार्ताहर 

लिंबाफाटा ते लिंब रस्त्यावर झालेल्या दुचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात आई ठार तर मुलगा जखमी झाला. आईला गुडघे दुखीवरील औषध घेवून माघारी येत असताना ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.  कमल बाळकृष्ण भोसले (वर्षे 56, रा. किरमाडे मळा, लिंब) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा संतोष बाळकृष्ण भोसले (वय 32) हे जखमी झाले आहेत.  कमल भोसले या गेल्या काही दिवसांपासून गुडघे दुखीने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांना औषध आणण्यासाठी संतोष

 हे आई कमल यांच्यासह दुचाकीवरून (क्र. एमच 11 सीबी 7256) मंगळवारी सकाळी पाचगणी येथे गेले होते. तेथून परत येत असताना सायंकाळी 4 च्या सुमारास लिंबफाट्यावरुन ते गावातील रस्त्याला लागले. त्यावेळी दुचाकी पुढे चाललेल्या ट्रॅक्टरला जाऊन जोरात धडकली. पाठीमागे बसलेल्या कमल भोसले रस्त्यावर पडल्याने गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघाताने लिंब परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
 

 

 

 

tags : Limb,news,limbaphata, Road, bikes,tractor,accidents, Mother, killed, 


  •