Mon, Jun 17, 2019 02:14होमपेज › Satara › गर्भपाताच्या गोळ्या खाल्याने मुलगी गंभीर

गर्भपाताच्या गोळ्या खाल्याने मुलगी गंभीर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

लिंब : वार्ताहर

सातारा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला गर्भ राहिल्यानंतर तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने अतिस्राव झाल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी युवकाविरुद्ध अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गर्भपाताच्या बेकायदेशीर गोळ्यांचा साठा सापडल्याचे प्रकरण ताजे असतानाच या मुलीला गर्भपाताच्या गोळ्या कोणी दिल्या, असा सवाल उपस्थित झाला आहे.

दिलीप धर्मा चव्हाण (वय 28, रा. लिंब) याच्याविरुद्ध सातारा तालुका पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल झाला    आहे. पोलिसांनी अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला दि. 31 तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी दिलीप चव्हाण हा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देवून डिसेंबर 2017 पासून वेळोवेळी अत्याचार करत आहे. 16 वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याने त्यातच गर्भवती राहिली. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास संशयिताने मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, अल्पवयीन मुलीला गर्भपात राहिल्याने संशयिताने दोन दिवसांपूर्वी त्या मुलीला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या होत्या. मुलीने त्या गोळ्या खाल्यानंतर तिचा अति रक्‍तस्त्राव झाला. मुलीची तब्येत बिघडल्याने उपचारासाठी तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी मुलीला तपासल्यानंतर घटनेचे निदान झाले व त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात धाव घेवून माहिती घेतली असता संशयित जीवे मारण्याची धमकी देवून वारंवार अत्याचार करत असल्याचा जबाब मुलीने दिला. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुध्द पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली. या घटनेचा पुढील तपास फौजदार स्वराज पाटील करत आहेत.

दरम्यान, सातारा तालुक्यातच गेल्या दोन दिवसांपूर्वी बेकायदा गर्भपात करणार्‍या औषधांचा साठा जप्‍त करण्यात आला आहे. याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यातच गुन्हा दाखल झालेला आहे.गर्भपात करणारी औषधे बिनधोकपणे मिळत असल्याने सातारा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय क्षेत्र हादरले असतानाच सोमवारी तालुका पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून त्या अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या दिल्या असल्याचे समोर येत आहे. यामुळे संशयित आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या कुठून आणल्या? गर्भपात विक्री करणारी टोळी कोणती आहे? या टोळीमध्ये कोणकोण आहे? गर्भपाताच्या गोळ्या किती रुपयांना विकल्या जात आहेत? असे अनेक सवाल उपस्थित झाले आहेत.

शिरवळमध्येही पोक्सोअंतर्गत युवकास अटक 

खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये अंगणातील शेडमध्ये पाणी पिण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीला घरामध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी युवकावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर मारुती महांगरे (वय 19) असे युवकाचे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.  शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये आठ वर्षीय मुलगी खेळत असताना दुपारच्या सुमारास अंगणातील शेडमध्ये पाणी पिण्यासाठी गेली होती.

यावेळी समीर महांगरे याने बोलावून घेत तिला घरात नेऊन तिच्याशी अश्‍लील चाळे केले व लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराची माहिती पीडित मुलीने आईला दिली. त्यानंतर समीर महांगरे या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या गुन्हाची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात करण्यात आली असून तपास पोनि भाऊसाहेब पाटील करत आहेत.
 

 

 

tags : Limb,news,atrocities, on, a minor,girl,offense, under,poxo,


  •