Thu, May 23, 2019 15:11
    ब्रेकिंग    होमपेज › Satara › मांजराची शिकार करताना बिबट्याचा मृत्यू 

मांजराची शिकार करताना बिबट्याचा मृत्यू 

Published On: Jan 25 2018 1:01AM | Last Updated: Jan 25 2018 1:01AMपाटण: प्रतिनिधी  

कोयना विभागात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील रासाटी (आंबेघर) नजीक शिकारीसाठी  मांजराचा पाठलाग करताना विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला.  

दरम्यान, विहिरीच्या कठड्याला थटून गंभीर जखमी होऊन बिबट्या विहिरीत पडल्याचे त्याचा मृत्यू झाला तर झटापटीत मांजरही मरण पावले, असे वनअधिकार्‍यांनी सांगितले. कोयना विभागात रासाटी हे गाव बफर झोन क्षेत्रात समाविष्ट आहे. या ठिकाणच्या आंबेघर येथील धनगरवाड्यात ठरावीक लोक वास्तव करतात. लोकवस्ती पासून ठराविक अंतरावर एक विहीर आहे. मंगळवारी सकाळी या विहिरीत एक बिबट्या पाण्यावर मयत अवस्थेत तरंगत असल्याचे गावकर्‍यांच्या निदर्शनास आले. 

त्यांनी याची माहिती वन्यजीव विभागाला दिली. वनअधिकार्‍यांनी बिबट्याला बाहेर काढले. या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले.