Sat, Aug 17, 2019 16:11होमपेज › Satara › बिबट्या किल्ल्यावरच घुटमळला

बिबट्या किल्ल्यावरच घुटमळला

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

किल्‍ले अजिंक्यतार्‍यावरील बिबट्याचा मुक्‍काम काही केल्या हलायला तयार नाही. दोन दिवसांपासून या परिसरात ठाण मांडलेल्या बिबट्याने रविवारीही पुन्हा दर्शन दिले. किल्ल्यावरील स्मृतीवन व महादेव मंदिर परिसरातच हा बिबट्या घुटमळत असून नागरिकांमधील भीतीचे वातावरण अद्यापही कायम आहे.

अजिंक्यतारा किल्‍ला परिसरात गेल्या काही महिन्यांपासून दोन बिबट्यांचा वावर आहे. बिबट्या नागरी वस्तीत येऊ लागला असून वारंवार नागरिकांच्या दृष्टीस पडत आहे. अजिंक्यतारालगत असणार्‍या निसर्ग कॉलनी, रामराव पवार नगर, गोळीबार मैदान, माची पेठ, कुरणेश्‍वर परिसरातही  बिबट्या फिरत असल्याचे वन विभागामार्फत सांगण्यात आले. हे बिबटे नागरिकांना दिवसाही दिसू लागले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी सकाळी किल्ल्यावर फिरावयास गेलेल्या काही नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले. तसेच सायंकाळी चारभिंती ते अजिंक्यतारा स्मृतीवन परिसरात असणार्‍या महादेव मंदिर परिसरातील  झाडीत असलेल्या एका मोठ्या दगडावर बिबट्या निवांत बसल्याचे नागरिकांना दिसून आले. त्यामुळे या दगडाचा लळा बिबट्याला चांगलाच लागला असल्याची चर्चा रंगली होती. बिबट्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी चार भिंती ते अजिंक्यतारा किल्‍ला प्रवेशद्वारापर्यंत गस्त सुरू केली  आहे. हा बिबट्या रोज त्या ठिकाणी येत असल्याने नागरिकांनी एकट्याने त्या रस्त्याने जाऊ नये, असे आवाहन वन विभागामार्फत करण्यात आले आहे.

 

Tags : satara, satara news, Ajinkyatara Fort, Leopard,


  •