Sun, Aug 25, 2019 04:37होमपेज › Satara › कास पर्यटन हंगामाचा शुभारंभ

कास पर्यटन हंगामाचा शुभारंभ

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 10:45PMसातारा : प्रतिनिधी

जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणून प्रसिध्द असलेल्या कास पुष्प पठाराच्या पर्यटन हंगामाचा शुभारंभ खा.श्री.छ. उदयनराजे भोसले,  आ. शिवेंद्रराजे भोसले  व उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने कास  पुष्प पठाराच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या गावातील  रूपेश चिकणे, अमृता आटाळे, किवास गोरे, नवनाथ कदम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनील काटकर, नगरसेवक अ‍ॅड दत्तात्रय बनकर, कास पठार कार्यकारी समितीचे अध्यक्ष सोमनाथ जाधव, मेढ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी  सचिन डोंबाळे, सातारच्या वनपरिक्षेत्र अधिकारी  शितल राठोड, वनपाल श्रीरंग शिंदे, एस.जी. कदम, आर.वाय.सावंत, अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते.

कास अधिकृत  संकेतस्थळावर कास पुष्प पठाराबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून या संकेतस्थळावरून पर्यटकांना कास पुष्पपठार प्रवेशासाठी ऑनलाईन बुकिंग देखील करता येणार आहे. पुष्प पठार कासवर शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी फक्त ऑनलाईन बुकिंग असणार्‍या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे.त्यामुळे या दिवशी ऑनलाईन बुकिंग निश्‍चित करूनच पर्यटकांनी यावे व होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन सातारा वनविभाग व कास पठार कार्यकारी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.