Thu, Apr 25, 2019 04:05होमपेज › Satara › पर्यटकांसाठी पाचगणीत ई- टॉयलेटचा  शुभारंभ

पर्यटकांसाठी पाचगणीत ई- टॉयलेटचा  शुभारंभ

Published On: Dec 26 2017 1:34AM | Last Updated: Dec 25 2017 10:22PM

बुकमार्क करा

भिलार : वार्ताहर

स्वच्छतेच्याबाबतीत देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या पाचगणी पालिकेने एक अभिनव योजना राबवली आहे. पर्यटननगरीतील गर्दीच्या ठिकाणी ई-टॉयलेट उभारून स्वच्छतेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलले आहे.

शहरात पर्यटकांच्या गर्दीच्या ठिकाणी चार ई-टॉयलेट बसविण्यात आली आहेत. टॉयलेट कुठेे आहे, याची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होत असल्याने पर्यटकांना तेथे तत्काळ पोहोचता येणार आहे. शहरात पहिल्यांदाच ही संकल्पना राबवण्यात येत आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात इतर ठिकाणी असे ई-टॉयलेट  बसवता येणार आहेत. ही अभिनव कल्पना असून अत्याधुनिक जीपीएस प्रणालीचा यात वापर करण्यात आला आहे. 

ई-टॉयलेटमध्ये अत्याधुनिक जीपीएस यंत्रणा आहे. एका व्यक्तीला बसता येईल, अशा भारतीय पद्धतीची यात व्यवस्था आहे. पाच रुपयांचे नाणे टाकल्यास दार उघडे होते. या टॉयलेटच्या पाण्याच्या टाकीत पाणी नसेल तर दार उघडत नाही. व्यक्ती बाहेर पडल्यावर आपोआप पूर्ण टायलेट वॉश होते. यात वॉश बेसीन आहे. टॉयलेटमध्ये काही अडचण अथवा टॉयलेटमध्ये व्यक्ती असल्यास लाल दिवा दिसतो. काही अडचण नसल्यास हिरवा दिवा लागतो.

पाहणीवेळी नगराध्यक्षा सौ. कर्‍हाडकर, नगरसेविका सौ. निता कासुर्डे, सौ. रेखा जानकर, नितिन मर्ढेकर, सुरेश मडके, गणेश कासुर्डे व नागरिक उपस्थित होते.