Sun, Nov 18, 2018 19:48होमपेज › Satara › सातारा जिल्ह्यात मातृत्व वंदन योजनेचा शुभारंभ

सातारा जिल्ह्यात मातृत्व वंदन योजनेचा शुभारंभ

Published On: Dec 19 2017 1:17AM | Last Updated: Dec 18 2017 8:35PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

गर्भवती महिला व माता कुपोषित राहून त्यांचे व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. यामुळे मातामृत्यू व बालमृत्यू दरात वाढ होते. माता व बालक यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी, यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान मातृत्व वंदना योजना सुरू केली आहे. याचा शुभारंभ जिल्ह्यात करण्यात आला आहे.  

या योजनेचा शुभारंभ जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनीत फाळके, डॉ. सचिन पाटील, डॉ. प्रमोद शिर्के व  आरोग्य अधिकारी उपस्थित होते. डॉ. पवार यांनी या योजनेची माहिती दिली. 

डॉ. कैलास शिंदे यांनी गर्भवती महिलांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. त्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन केले. योजनेसाठी तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नियोजन करण्यात आलेले असून जिल्हास्तरावरुन पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे रोज या कामाचा आढावा घेऊन कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे.