Fri, Nov 16, 2018 19:42होमपेज › Satara › मेढ्यामध्ये लग्‍नाच्या वरातीत हाणामारी

मेढ्यामध्ये लग्‍नाच्या वरातीत हाणामारी

Published On: Dec 11 2017 6:46PM | Last Updated: Dec 11 2017 6:46PM

बुकमार्क करा

कुडाळ : प्रतिनिधी

लग्नात श्रीवंदनच्या वरातीत मेढा येथे दोन गटात नाच गाण्यावरून झालेल्या मारहाणी प्रकरणी वधू पक्षाच्या वर्‍हाडी मंडळीतील 5 युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मेढा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मेढा, ता. जावली  येथे रविवारी सायंकाळी 5 च्या दरम्यान मोहाट पुलादरम्यान  असलेल्या मंगल कार्यालयाजवळ श्रीवंदनासाठी वरात निघाली होती. या वरातीमध्ये वधू पक्षाच्या वराडी मंडळीतील युवकांनी बँड बाजा नाचण्यावरून व लग्नाला उशीर होत आहे डान्स करू नका असे सांगितल्यानंतर वर आणि वधू पक्षातील युवकांमध्ये सुरूवातीला वादावादी झाली. 

या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाली. यावेळी वधू पक्षाकडील युवकांनी वर पक्षाच्या युवकांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झाले आहे. या मारहाणीत गणेश भिकू  शिर्के, विशाल विठ्ठल पिसाळ, समीर सुनील पिसाळ, जीवन पोपट शिर्के सर्व रा. वडाचे म्हसवे हे जखमी झाले आहे. यामधील दोघांना अधिक उपचारासाठी सातार्‍याला हलवण्यात आले आहे. 

गणेश शिर्के रा. वडाचे म्हसवे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून प्रतीक उर्फ गोट्या रमेश चिकने, आदित्य विजय वेंधे, सिद्धेश पांढुरंग यादव, ऋषिकेश अर्जुन चिकने, अजय उर्फ सोन्या ज्ञानेश्‍वर कुंभार सर्व रा. कुसूंबी यांच्यावर मेढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी तात्काळ सुत्रे हलवत प्रतीक चिकणे व अजय कुंभार  या दोघांना अटक केली आहे.