Mon, Apr 22, 2019 12:24होमपेज › Satara › कराड : ‘क्षणबद्ध’मधून लेह, लडाखसह वाल्मिकी खोऱ्यांचे दर्शन

कराड : ‘क्षणबद्ध’मधून लेह, लडाखसह वाल्मिकी खोऱ्यांचे दर्शन

Published On: Aug 17 2018 2:43PM | Last Updated: Aug 17 2018 2:43PMकराड : प्रतिनिधी

कराड (जि. सातारा) येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृतीसदन येथे शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास  छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात झाली. क्रिएटिव्ह कराडकर या ग्रुपकडून आयोजित ‘क्षणबद्ध’ या कराडसह जिल्ह्यातील फोटोग्राफर्स यांनी टिपलेल्या छायाचित्रांचा यात समावेश आहे.

ज्येष्ठ चित्रकार दादासाहेब सुतार, पंढरपूर येथील विठ्ठल रू्निमणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. अतुल भोसले, क्रिएटिव्ह कराडकर या ग्रुपचे सदस्य तथा लोकशाही आघाडीचे गटनेते नगरसेवक सौरभ पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे चेअरमन जयंत पाटील, बजरंग माने यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत क्षणबद्धला प्रारंभ झाला.

महाविद्यालयीन युवक, अबालवृद्ध, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सकाळपासून प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. आळंदी आणि देहूतून पंढरपूरला निघणाऱ्या वारीचे ग्लोबल रूप, तरडगावसह रिंगण असणाऱ्या ठिकाणचे अप्रतिम व थक्क करायला लावणारी छायाचित्रे या प्रदर्शनात आहेत. काश्मिरमधील लेह, लडाखपासून ते वाल्मिकी जंगलातील प्राण्यांची, जीवनशैलीचे टिपलेले क्षण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजगड, रायगडसह विविध किल्ल्यांची छायाचित्रे या प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे. रविवारपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असणार आहे.