Wed, Apr 24, 2019 16:38होमपेज › Satara › आंदोलनस्थळीच प्रकल्पग्रस्तांचा पाडवा

आंदोलनस्थळीच प्रकल्पग्रस्तांचा पाडवा

Published On: Mar 18 2018 1:05AM | Last Updated: Mar 17 2018 10:49PMपाटण : प्रतिनिधी

कोयना प्रकल्पग्रस्तांनी गेल्या 17 दिवसांपासून कोयनानगर येथे ठिय्या आंदोलन सुरु केले असून आंदोलन स्थळावर होळी आणि होळीचे सर्व सण केलेत आता गुढीपाडवा आंदोलन स्थळावर करणार आंदोलकांनी निर्णय घेतला आहे.

गेल्या 17 दिवसांपासून सुरु असलेले कोयनाप्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलनाने आता नवे वळण घेतले असून शनिवार पर्यंत मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली औपचारिक बैठक जाहीर झाल्याचे पत्र आले नाही तर रविवारी पाडव्याची गुढी उभारून सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला धरणग्रस्तच जायला सुरुवात करून हजारोंच्या संख्येने धरणग्रस्त स्त्री पुरुष 19 मार्च रोजी मुंबईच्या दिशेने चालायला सुरुवात करतील,असा निर्णय कोयनानगर येथील ठिय्या आंदोलनात घेण्यात आला.      

मंगळवारी डॉ. भारत पाटणकर यांनी हा प्रस्ताव मांडल्यावर ठिय्या आंदोलनातील हजारो स्त्री पुरुषांनी हात वर करून एकमताने निर्णय घेतला. त्यामुळे ‘मुंबई लाँग मार्च’ हा निर्णय घेतला  असल्याची माहिती सर्व गावातून मुंबईला कामाला असलेल्या चाकरमान्यांना कळविण्यात आला आहे. 

लाँग मार्च जसा पुढे जाईल तसतसे टप्प्या टप्याने श्रमिक मुक्ती दलाच्या चळवळीतील विविध प्रकारचे शेतकरी ,शेतमजूर, श्रमिक जनता लाँग मार्चची संख्या वाढविण्यात येईल आणि कोयना धरणग्रस्तांची ही चळवळ आम जनतेची चळवळ बनेल. बड्या बड्या भांडवलदारांची लाखो कोटींची कर्जे रद्द करणारे सरकार कोयना धरण ग्रस्ताच्या न्याय मुद्द्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही ,राज्य जनतेच्या आधारावर चालते,भांडवलदारांच्या आधारावर नाही न्हवे याची जाणीव सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी ठेवणे गरजेचे आहे,अशी तीव्र प्रतिक्रिया प्रकल्पग्रस्तमधून व्यक्त होत आहेत.

मुंबईतील बैठकीकडे प्रकल्पग्रस्तांचे लक्ष ...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी मुंबईत प्रकल्पग्रस्तांशी शासन चर्चा करणार आहे. त्यामुळे या बैठकीनंतर मुंबईकडे रवाना व्हायचे अथवा नाही, याचा निर्णय प्रकल्पग्रस्त घेणार आहेत. मात्र असे असले तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले आहे.

 

Tags : satara, patan, patan news, koyna project affected, agitation,