Fri, Jul 19, 2019 05:53होमपेज › Satara › कोरेगावच्या जवानाचे हृदयविकाराने निधन 

कोरेगावच्या जवानाचे हृदयविकाराने निधन 

Published On: Dec 25 2017 12:37PM | Last Updated: Dec 25 2017 12:36PM

बुकमार्क करा

कोरेगाव : प्रतिनीधी 

वाठार (किरोलीचे ) सुपुत्र नारायण धोंडिबा ठोंबरे (वय, ४७) या जवानाचे सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते आसाम तेजपुरमध्ये  4  कोर तोफखाना ब्रिगेड या ठिकाणी कार्यरत होते. ठोंबरे हे मार्च 1990 ला आर्मीमध्ये भरती झाले होते. 

ठोंबरे यांच्या निधनाने वाठार गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शोभा,  मुलगा सुरज (वय -19 ) आणि धीरज (वय - 17), असा परिवार आहे.