Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Satara › चाकूचा धाक दाखवून चालकास लुटले 

चाकूचा धाक दाखवून चालकास लुटले 

Published On: Aug 27 2018 1:17AM | Last Updated: Aug 26 2018 10:26PMवाखरी : वार्ताहर

शरयू सहकारी साखर कारखान्याच्या साखर घेऊन जाणार्‍या दोन ट्रक चालकांना अज्ञात चोरट्याने चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना शुक्रवारी (दि. 24) रात्री बीबी पावरहाऊसनजीक 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. 

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, बारामती येथील दोन ट्रक शुक्रवारी शरयू साखर कारखाना येथून साखर घेऊन निघाले होते. फलटण सातारा मार्गावर आल्यानंतर हे ट्रक पावरहाऊस रस्त्याचा चढ चढण्यापूर्वी अज्ञात चोरट्याने आपली दुचाकी ट्रकला आडवी मारून त्यांच्याशी हुज्जत घालत दोन्ही ट्रकचालकाकडून 20 हजार रुपये व मोबाईल घेऊन पोबारा केला.

दरम्यान, ट्रकचे मालक नजीकच पावरहाऊस येथे आपल्या चार चाकी वाहनात या ट्रकची वाट पहात होते पण, बराच वेळ ते येत नसल्याने ते ट्रकचालकांकडे गेले. संबंधित प्रकार त्यांना समजला. यानंतर आदर्की पोलीस दूरक्षेत्र येथे तक्रार देण्यासाठी ते आले असता कोणीही पोलीस स्टेशनला नसल्यामुळे त्यांना रात्री उशिरापर्यंत तक्रार देण्यासाठी ताटकळत थांबावे लागले.