Wed, Jul 24, 2019 08:19होमपेज › Satara › किसन वीरवर कृषी-पुष्प प्रदर्शन

किसन वीरवर कृषी-पुष्प प्रदर्शन

Published On: Jan 22 2018 1:22AM | Last Updated: Jan 21 2018 10:07PMभुईंज : वार्ताहर

कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी किसन वीर साखर कारखान्याने कार्यस्थळावर 23 ते 25 जानेवारीअखेर कृषी व पुष्पप्रदर्शन आयोजित केले असून सकाळी 9.30 वाजता कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन आणि सहस्त्र वृक्षारोपण कार्यक्रम राज्याचे साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांच्या हस्ते आणि पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या हस्ते व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, जिल्हा परिषद कृषी विभाग आणि वाई तालुका अ‍ॅग्री डिलर्स असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने 22 ते 25 जानेवारीअखेर होणार्‍या अखंड नामयज्ञ सोहळ्याचे औचित्य साधून कृषी व पुष्प प्रदर्शन होणार असून यावेळी कृषी सहसंचालक महावीर जंगटे, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी  डॉ. सी. जी. बागल, उपविभागीय कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी राजेंद्र साबळे, श्री महालक्ष्मी शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्षा डॉ. निलिमा भोसले, लागिरं झालं जी मालिकेच्या निर्मात्या, सिनेकलाकार श्‍वेता शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यस्थळावर नरेंद्र बोर, हनुमान फळ, कवठ, बेल अशा सहस्त्र वृक्षारोपणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या  उपस्थितीत होणार आहे.

आधुनिक शेती तंत्रज्ञानासह विविध रासायनिक,जैविक व सेंद्रिय खते,बि-बियाणे, किटकनाशके, तणनाशके, बूरशीनाशके, औषधे असे माहिती देणारे सुमारे शंभर स्टॉल या कृषि प्रदर्शनात लावण्यात येणार आहेत. कृषी प्रदर्शन व पुष्प प्रदर्शनाच्या माहितीसाठी कारखान्याच्या ऊस विकास कार्यालयाशी  संपर्क साधावा, असे आवाहन अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, संचालक मंडळाने  केले आहे.नागपूर येथील महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघाच्यावतीने 22 ते 25 जानेवारी दरम्यान खादीचे कापड, साड्या, बेडशिट, कुर्ता, शॉल आदींची विक्री प्रदर्शनादरम्यान करण्यात येणार आहे.