Fri, Apr 26, 2019 19:20होमपेज › Satara › ग्राहक संस्थेत केशवरावांनी केलेले काम मोलाचे : खा. पवार

ग्राहक संस्थेत केशवरावांनी केलेले काम मोलाचे : खा. पवार

Published On: May 11 2018 1:44AM | Last Updated: May 11 2018 12:04AMसातारा : प्रतिनिधी

केशवराव पाटील यांनी पुढाकार घेत ग्राहक संस्था सुरू केली. सामान्य माणसांच्या जीवनात मदत करणारी ही ग्राहक संस्था आहे. सहकाराचा अर्थ सर्वसामान्यांच्या जीवनात अनुभवण्यास मिळेल, यासाठी केशवरावांनी केलेले काम मोलाचे आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी काढले. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी ग्राहक संघाच्या केशवराव पाटील व्यापारी संकुल इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती  ना. रामराजे नाईक-निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, खा. सुप्रिया सुळे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे व मान्यवर उपस्थित होते. 

खा. पवार म्हणाले, आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी अलीकडे ग्राहक चळवळ मोडीत काढण्यास सुरुवात केली आहे. जागतिक स्तरावरील मोठ्या कंपनी देशात येत असल्याने ग्राहक चळवळीपुढे मोठी स्पर्धा आहे. आमच्या काळात या संस्थांना थांबवले होते. मात्र, अलीकडे त्यांना परवानग्या दिल्या आहे. वास्तविकता  ग्राहक संस्था टिकवायची असेल तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांना थांबवले पाहिजे. 

सध्या अनेक मोठे मॉल बंद पडू लागले आहेत. गरजूंपेक्षा केवळ एअर कंडीशनचे वारे घेण्यासाठी अनेकजण तेथे जात असल्याने हा परिणाम होत आहे. परंतु, विदेशात ज्यांना मजबूत पाठिंबा आहे, ते सध्या चालले आहेत. सातारा जिल्हा सहकारी ग्राहक संघाने अशा काळात प्रगती सुरु ठेवली आहे. हे अभिनंदनीय असल्याचेही खा. पवार यांनी सांगितले.