Fri, Jul 19, 2019 20:47होमपेज › Satara › आगीच्या दुर्घटनेनंतर ‘केसरी’चे पॅकअप

आगीच्या दुर्घटनेनंतर ‘केसरी’चे पॅकअप

Published On: Apr 28 2018 1:45AM | Last Updated: Apr 27 2018 9:05PMसातारा : प्रतिनिधी

पिंपोडे बुद्रुक,  ता.कोरेगाव येथे अक्षय कुमार यांच्या केसरी चित्रपटाच्या चित्रीकरणदरम्यान सेटला आग लागून 24 एप्रिल रोजी झालेल्या दुर्घटनेनंतर या ठिकाणावरील चित्रीकरण बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच या  ठिकाणावरून चित्रिकरण साहित्य हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पिंपोडे बुद्रुक येथे गेले तीन महिन्यांपासून अक्षय कुमार यांच्या केसरी या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू होते.दरम्यान  दि.24 रोजी सायंकाळी  साडे पाच वाजता  चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी  सेटला आग लागली.यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी चित्रिकरणाचा सेट जळून खाक झाला. या दुर्घटनेनंतर  गुरूवारी अक्षय कुमार यांनी घटनास्थळावर हजेरी लावली व काही वेळ सर्व सहकार्‍यांशी चर्चा करून या ठिकाणावरील चित्रीकरण बंद करून या ठिकाणावरील साहित्य हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आगीची झळ युवकांना व व्यवसायिकांना  

या ठिकाणी सुरू असलेल्या चित्रीकरणामुळे परिसरातील युवकांना रोजगार तसेच वाहन धारक व इतर  व्यावसायिकांना अर्थिक मिळकत मिळत  होती परंतु या दुर्घटनेनंतर संबंधितांनी चित्रिकरण बंद करण्याचा निर्णय घेतल्याने  आगीची झळ परिसरातील युवकांना व व्यावसायिकांना देखील बसली आहे.

 

Tags : satara, satara news, Kesari film, shooting, Packup, Fire Accident