होमपेज › Satara › कराड : किसान सभेचा तहसील कार्यालयास घेराव (Video)

कराड : किसान सभेचा तहसील कार्यालयास घेराव (Video)

Published On: Jun 01 2018 1:58PM | Last Updated: Jun 01 2018 1:58PMकराड  : प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) येथे शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर अखिल भारतीय किसान सभेने जोरदार निदर्शने केली. शेतकर्‍यांसह महिलांनी यात सहभाग घेतला होता. कराड तहसील कार्यालयासमोर सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचा निषेध करण्‌यात आला. शेतकर्‍यांच्या संपाची दखल घेतली नाही, तर दोन दिवसांनी आंदोलन तीव्र करण्यासह प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

पाटण (जि. सातारा) येथील वांग - मराठवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकर्‍यांवरील अन्याय त्वरित दूर करावा, किसान लॉंग मार्चच्या मान्य झालेल्या मागण्यांची त्वरित अंमलबजावणी करा, शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, दुधाला दरवाढ मिळलीच पाहिजे यासह अन्य मागण्यांबाबत घोषणा देत राज्य शासनासह केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचाही यावेळी निषेध करण्यात आला.