Wed, Mar 27, 2019 04:20



होमपेज › Satara › अपघातात कराडचे चौघेजण जखमी

अपघातात कराडचे चौघेजण जखमी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





तासवडे टोलनाका : वार्ताहर

रस्त्याचा अंदाज न आल्याने मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास कार 80 फूट खोल खड्डयात पडून कराड तालुक्यातील चौघे युवक जखमी झाले आहेत. तासवडे (ता. कराड) गावच्या हद्दीत एमआयडीसीमध्ये हा अपघात झाला आहे. 

आकाश अशोक पाटील (वय 21 रा. शिवाजी हौ. सोसायटी, कराड), शुभम संजय जाधव (वय 19 रा. मंगळवार पेठ, कराड), स्वप्निल संजय शिंदे (वय 20 रा. उंब्रज) आणि वैभव सुखदेव कुराडे (वय 19 रा. गजानन हौसिंग सोसायटी, कराड), अशी जखमींची नावे आहेत. हे चौघे एमएच 12 एचव्ही 2806 या कारमधून एमआयडीसीमधून मुख्य रस्त्याकडे येत होते. यावेळी अंधारामुळे त्यांना रस्ता संपल्याचा अंदाज आला नाही आणि कार खड्डयात कोसळली. सुदैवाने खड्डयातील झाडांमध्ये कार अडकल्याने चौघेही बचावल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

Tags : Karad  accident, Karads four injured, satara news 






  •