Fri, Jul 19, 2019 13:28होमपेज › Satara › कराडातील कचरा डेपो होणार नष्ट 

कराडातील कचरा डेपो होणार नष्ट 

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 10:38PMकराड : प्रतिभा राजे

कराड नगरपालिकेकडून कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोगॅस, कंपोस्ट पीठ तयार करण्यात आले असून नगरपालिका कचर्‍याचे बायोमायनिंग करत आहे. याद्वारे कचरा चाळला जात असून  घनकचरा प्रकल्पाअंतर्गत ओल्या कचर्‍यापासून विजनिर्मिती, खतनिर्मिती करण्यात येत आहे. बारा डबरी परिसरात कचर्‍यावर विविध प्रकारे प्र्रक्रिया करण्यात येत असून कराडातील कचरा डेपो नष्ट करण्याचे उद्दिष्ठ पालिकेने ठेवले आहे. 

स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत कराड नगरपालिकेने शहरात अनेक स्वच्छतेचे उपक्रम राबवले. यासाठी प्रथम कचर्‍याचे विलगीकरण करण्यात आले. कचरा गोळा करताना तो उघड्यावर राहू नये यासाठी पोत्यामध्ये कचरा भरण्यात येतो.  त्यानंतर कंपोस्ट पीठ द्वारे कचर्‍याचे खत तयार करण्यात येते.   न कुजणार्‍या कचर्‍याचे गठ्ठे तयार करून ते सिमेंट कारखान्यांना दिले जाते. सुका व ओल्या कचर्‍याचीही रोजच्यारोज चाळण करण्यात येत असून त्याद्वारे वेस्ट, प्लॅस्टिक याचे विलगीकरण करण्यात येते. तासवडे एमआयडीसीतील कंपनीत हे प्लॅस्टिक दिले जाते त्यामुळे शहरातील प्लॅस्टिक नष्ट करण्याची समस्या बर्‍याच अंशी कमी झाल्याचे नगरसेवक विजय वाटेगावकर यांनी सांगितले.

  कचर्‍याचे विलगीकरण करून कचरा नष्ट करण्याचे मोठे आव्हान पालिकेपुढे होते. आता मात्र शहरातून जमा होणार्‍या वर्गीकरण केलेल्या कचर्‍याचे रोज चाळण करून त्यावर प्रक्रिया केली जाते. अशातर्‍हेने भविष्यात कचरा डेपो राहणार नाही यासाठी मुख्याधिकारी यशवंत डांगे, विजय वाटेगावकर व पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.  

कचर्‍यासाठीबकेटची मागणी

कचरा साठवण्यासाठी नगरपालिकेस अर्बन बँकेकडून बकेट देण्यात आली होती. या बकेटचे वाटप शहरात नागरिकांना करण्यात आले. मात्र अजूनही बकेटची आवश्यकता असून अजून 5 हजार बकेटची 
मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबासाठी ओल्या कचर्‍यासाठी एक बकेट देण्यात येत आहे.
 

  • कचर्‍यापासून विजनिर्मिती
  • कचर्‍यापासून खत निर्मिती
  • प्रक्रियेसाठी प्लॅस्टिक कचरा कंपनीकडे 
  • कचर्‍याचे गठ्ठे बांधून कचरा सिमेंट कारखान्याकडे
  • कचरा डेपोच्या जागी गार्डन तयार करणार