Thu, Jun 20, 2019 00:48होमपेज › Satara › कस्तुरींना मिळाल्या आरोग्यदायी टिप्स

कस्तुरींना मिळाल्या आरोग्यदायी टिप्स

Published On: Feb 16 2018 1:50AM | Last Updated: Feb 15 2018 8:23PMकराड : प्रतिनिधी

संगीत मानवाचा ताण हलका करते. मनामध्ये आनंदी तरंग  उमटवण्याची ताकत संगीतामध्ये असते. यामुळेच मधूर संगीताचा आस्वाद घेत व  आरोग्यदायी टिप्स देत  महिलांच्या विविध आजारांची कारणे, लक्षणे, उपायांची माहिती व सुखी, आनंदी आरोग्य जगण्याची व जपण्याची गुपिते येथील सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी उलघडली. दै. ‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबच्यावतीने येथील दि कराड अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयातील शताब्दी सभागृहामध्ये झालेल्या ‘म्युझिकल हेल्थ’ कार्यक्रमामध्ये सह्याद्रि हॉस्पिटलच्या माध्यमातून  ‘स्त्री आरोग्य काळजी व प्रतिबंधात्मक उपाय’ अशा विषयावरचा कार्यक्रम झाला. यावेळी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, ह्याद्री हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ. व्यंकटेश मुळे, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. हेमंत तडसकर,अनन्या फॅशनच्या सीमा पिसे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत दै. पुढारीचे कराड कार्यालय प्रमुख सतीश मोरे यांनी केले. यावेळी वरिष्ठ उपसंपादक अमोल चव्हाण, मार्केटिंग एक्झ्युकेटिव्ह विकास पाटील यांची उपस्थिती होती. 

डॉ. हेमंत तडसकर म्हणाले, सुर्योदयापूर्वी उठणे व सुर्यास्तापूर्वी आहार घेणे ही उत्तम आरोग्य जपण्याची गुरूकिल्ली आहे. मानसिक, सामाजिक, अध्यात्मिक दृष्ट्या व्यवस्थित असणं म्हणजेच आरोग्य उत्तम असणं. ताणतणाव, आधुनिक जीवनशैली, व्यासनाधिनता, आळशीपणा यामुळे आयुष्य धोक्यात येत आहे. बदलते हवामान स्विकारण्याची संधी शरीराला दिली पाहिजे असे सांगून आधुनिक जीवनशैलीमुळे आरोग्य धोक्यात येत आहे यासाठी ‘ज्याचे जेवणावर कंट्रोल त्याचे जीवनावर कंट्रोल’, ‘चालाल तर चालाल’, ‘हसाल तर टिकाल’, अशा महत्वपूर्ण टिप्स दिल्या. रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरात होणारे बदल, गर्भाशयाचे विकार याची माहिती दिली. 

डॉ. दिग्विजय पाटील यांनी कर्करोगाची लक्षणे, उपाय सांगत विशेषत: महिलांमध्ये होणारा स्तनाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर याची सविस्तर माहिती दिली. केवळ अज्ञानामुळे गर्भाशयाच्या कॅन्सरने भारतात दरवर्षी 12 हजार महिला मृत्यूमुखी पडतात. असे सांगून त्यासंदर्भातील लसीची माहिती देवून कॅन्सरची लक्षणे दिसून आली की तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. यावेळी आसिफ बागवान, अनिस, कविता यांनी गायलेल्या बहारदार गाण्यांनी कस्तुरी मंत्रमुग्ध झाल्या. यावेळी आज से पहले आज से जादा, एक बंजारा गाए, जिंदगी प्यार का गीत है,  रोते हुए आते है सब, मै जिंदगी का साथ निभाता चला, आती रहेगी बहारे, रूक जाना नही, जिंदगी की यही रीत है अशी सुमधुर गाणी  गायली. यावेळी आरोग्यविषयक व्याख्यान व त्या आशयाची गाणी याची सुंदर गुंफण निवेदनाने कस्तुरी क्लबच्या कोˆ ऑर्डिनेटर श्रुती कुलकर्णी यांनी केली. कार्यक्रमास कस्तुरी क्लबच्या सदस्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.