Wed, Nov 14, 2018 22:59होमपेज › Satara › रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर : आ. शंभूराज देसाई 

रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर : आ. शंभूराज देसाई 

Published On: Feb 04 2018 1:58AM | Last Updated: Feb 03 2018 10:32PMकराड : प्रतिनिधी 

राज्य शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सुचविण्यात आलेल्या आठ रस्त्यांच्या कामापैकी पहिल्या टप्प्यात चार रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली आहे. या कामांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने पारित केला असून चार रस्त्यांच्या कामांकरीता  7 कोटी  33 लाख 55 हजार रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आ. शंभूराज देसाई यांनी  दिली आहे.

पत्रकामध्ये आ. शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे की, पाटण तालुक्यातील वजरोशी ते चिंचेवाडी रस्ता करणे,    कंकवाडी बनपुरी ते कडववाडी बनपुरी रस्ता,उरुल ते बोडकेवाडी रस्ता व मारुल तर्फ पाटण ते वाजेगांव रस्ता करणेकरीतानिधी मंजुर करण्यात आला आहे तर या चारही कामांची पाच वर्षाकरीता नियमित देखभाल दुरुस्ती करणेकरीता रकमेची तरतूदही शासनाने केली असून या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याचा शासन निर्णय शासनाच्या ग्रामविकास विभागाने पारित केला आहे.

 या कामांना लवकरच सुरुवात होईल तर उर्वरीत चार रस्त्यांच्या कामांनाही प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया शासनाच्या ग्रामविकास विभागाकडे सुरु असून या कामांनाही लवकरच प्रशासकीय मान्यता मिळून निधी मंजूर होईल असेही आ. म्हटले आहे.