होमपेज › Satara ›  कराडः उसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या

 कराडः उसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या

Published On: Jan 08 2018 3:24PM | Last Updated: Jan 08 2018 3:24PM

बुकमार्क करा
कराडः प्रतिनिधी

गमेवाडी (ता. कराड, जि.सातारा) येथील खमताळ नावाच्या शिवारात आज सकाळी बिबट्या मृत आवस्थेत आढळला. त्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलिस आणि वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी बिबट्याच्या मृत्युच्या पंचनाम्याचे काम सुरु केले आहे.

गमेवाडीतील खमताळ नावाच्या शिवारात दिपक रघुनाथ जाधव यांच्या शेतात आज सकाळी नऊच्या सुमारास शेतकरी गोविंद जाधव हे जनावरांना चारा आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी ऊसाच्या एका सरीत बिबट्या मृत आवस्थेत पडल्याचे त्‍यांना आढळून आले. त्यामुळे ते घाबरले. त्यांनी त्यातुन स्‍वताला सावरत संबंधित घटनेची माहिती पोलिस पाटील चंद्रकांत जाधव यांना दिली. जाधव यांनी या घटनेची माहिती वन विभाग आणि पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर तातडीने पोलिस उपनिरीक्षक अशोकराव भापकर, हवालदार संग्रासिंह फडतरे, धीरज पारडे, वन विभागाचे वनरक्षक बी. ए. माने, वनपाल ए. आऱ. येळवे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्याची पाहणी केल्यावर त्यांना संबंधित बिबट्या हा गरोदर असल्याचे निदर्शनास आले.
दरम्‍यान या बिबट्‍याचा मृत्‍यू सर्पदंशाने झाल्‍याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.