होमपेज › Satara › कराडातील एकवीस  मटकाबुकी तडीपार

कराडातील एकवीस  मटकाबुकी तडीपार

Published On: Mar 03 2018 1:43AM | Last Updated: Mar 02 2018 11:29PMकराड : प्रतिनिधी

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका, जुगार चालविणार्‍या टोळीचा प्रमुख उमेर अल्ताफ मुजावर याच्यासह 21 जणांवर सातारा, सांगली  जिल्ह्यांतून तडीपारीची कारवाई केली आहे, अशी माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो.नि. प्रमोद जाधव यांनी दिली.  उमेर अल्ताफ मुजावर (वय 30, रा. सोमवार पेठ, कराड), बरकत इलाही मुजावर (वय 45, रा. मुजावर कॉलनी), वसंत अंतू भोंडे (वय 45, रा. टाकेवस्ती (चचेगाव, ता. कराड), प्रकाश तुकाराम दुपटे (वय 46  रा. कार्वे नाका, कराड), मधुकर प्रकाश साळुंखे (वय 50, रा. शिरवडे), रमशाद रशीद मलबारी (वय 30, रा. मलकापूर), अनिल रवींद्र वारे (वय 23, रा. बुधवार पेठ, कराड), रमेश साहेबान्‍ना सिंदगी (वय 46 , रा. बैलबाजार रोड, मलकापूर),

समीर गौस शेख (वय 25, रा.  सुमंगलनगर, कार्वे नाका), नजीब अब्दुल मलबारी (वय 44 , रा. मलकापूर, कराड),  साजीद हनिफ मलबारी (वय 33, रा. गणेश मंगल कार्यालयाशेजारी मलकापूर), गणेश रशिद भोसले (वय 30  रा. बुधवार पेठ, कराड), कामेश भिमराव नाटेकर (वय 33 , रा.मार्केट यार्ड, गेट नं. 1 समोर, ऑईल मिलजवळ, शनिवार पेठ, कराड), महिंदु महंमद मलबारी (वय 56, रा. 239 शनिवार पेठ, कराड), सुनिल हिंदुराव पवार (वय 51 , रा. गोटे), अनंत शहाजी कांबळे (वय 24 , रा. प्रभात टॉकिजसमोर, कराड), ज्ञानेश्‍वर विश्‍वनाथ माने (वय 34, रा. नांदलापूर), प्रल्हाद अश्रू माने (वय 44, रा. चचेगांव), विजय शंकर माने (वय 47, रा. सोमवार पेठ, कराड), प्रतापराव

निवृत्ती कवडे (वय 65, रा. विरवडे), वसीम नवाज शेख (वय 30, रा. कार्वे नाका, कराड), रियाज निझाम बुराण (वय 38, रा. पोस्टल कॉलनी, कार्वेनाका).ही टोळी कराड शहर पोलिस ठाणे हद्दीत बेकायदा मटका जुगार चालवित होती. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यांंचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. त्यांच्याकडून कराड शहर हद्दीत हिंसक घटना घडून भीती व दहशतीचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून या टोळीतील प्रस्तावित 22 इसमांना हद्दपार करणेबाबत प्राधीकरण तथा सातारा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सप 1951 खे कलम 55 अन्वये सातारा, कराड, खटाव, पाटण, माण, कोरेगांव तालुका (जि. सातारा), कडेगाव, वाळवा, शिराळा (जि. सांगली) हद्दीतून एक वर्ष कालावधीकरीता हद्दपारीचा आदेश देण्यात आला आहे. आदेशाची अंमलबजावणी झाल्यानंतर 48 तासांचे आत त्यांनी हद्दीबाहेर गेले पाहिजे, असाही आदेश केला आ