Wed, Jul 24, 2019 15:14होमपेज › Satara › अनुदान मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन : आ. दत्तात्रय सावंत 

अनुदान मंजूर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन : आ. दत्तात्रय सावंत 

Published On: Dec 20 2017 1:45AM | Last Updated: Dec 19 2017 10:48PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

राज्यातील 1 व 2 जुलै 2016 रोजी अनुदानास पात्र ठरलेवल्या शाळांना एक वर्ष होऊनही अद्याप अनुदान मंजूर केले नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत शिक्षक सापडले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी त्वरीत अनुदान मंजूर करावे, यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक व पदवीधर आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली. 

यावेळी अधिवेशनास अनुदान मंजूर करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली. उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांचे मुल्यांकन होवून दोन ˆ तीन वर्षे झाली. परंतु, याद्या घोषित झाल्या नाहीत. 15 ते 16 वर्षे अनुदानाची प्रतिक्षा राज्यातील हजारो शिक्षक करीत आहेत. त्यामुळे मुल्यांकन केलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यांची यादी घोषित करण्याबाबतही चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी चर्चा करून याद्या घोषित करण्यास आदेशीत केली असल्याची माहिती आ. सावंत यांनी दिली. 

शिक्षकांच्या प्रश्‍नांवर विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला घेरण्याचा प्रयत्न शिक्षक आमदार करीत आहेत. त्यामध्ये दत्तात्रय सावंत, आ. बाळाराम पाटील, आ. श्रीकांत देशपांडे, आ. कपिल पाटील, आ. सुधीर तांबे, आ. विक्रम काळे, आ. सतीश चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेतला.