Tue, May 21, 2019 00:40होमपेज › Satara › मद्यपीचा वीज वितरण कार्यालयात गोंधळ

मद्यपीचा वीज वितरण कार्यालयात गोंधळ

Published On: Mar 06 2018 10:46PM | Last Updated: Mar 06 2018 10:37PMकराड : प्रतिनिधी 

शेणोली स्टेशन (ता. कराड) परिसरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या शाखा कार्यालयात घुसून मद्यपीने एका कर्मचार्‍यास मारहाण तसेच धक्‍काबुक्‍की केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी कराड तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

शेणोली स्टेशन येथे शेरे, शेणोली, गोंदी तसेच परिसरातील गावांसाठी विद्युत वितरण कंपनीचे शाखा कार्यालय आहे. या कार्यालयात मंगळवारी साडेचारच्या सुमारास अचानकपणे एका मद्यपीने घुसून गोंधळ घालण्यास प्रारंभ केला. 

घरासमोर असणार्‍या विद्युत खांबावरील बल्ब गेल्याचे सांगत त्या मद्यपीने काही समजण्यापूर्वीच वितरण कंपनीच्या एका कर्मचार्‍याला लक्ष्य करत हुज्जत घातली. यावेळी धुक्‍काबुक्‍कीही करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. 

या प्रकारावेळी परिसरातील अन्य लोकांसह कर्मचार्‍यांनी हस्तक्षेप करत त्या मद्यपीस कार्यालयातून बाहेर नेले. त्यानंतर वितरण कंपनीचे कर्मचारी पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. याप्रकरणी गुन्हा नोंद नसल्याने घटनेबाबतची अधिक माहिती सायंकाळपर्यंत उपलब्ध होऊ शकली नव्हती. तसेच संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले नव्हते.