Sun, Jul 05, 2020 03:29होमपेज › Satara › कारचा टायर फुटल्याने कराडचे दाम्पत्य गंभीर जखमी 

कारचा टायर फुटल्याने कराडचे दाम्पत्य गंभीर जखमी 

Published On: Dec 25 2017 1:18AM | Last Updated: Dec 24 2017 10:57PM

बुकमार्क करा

भुईंज : वार्ताहर

जोशीविहीर उड्डाणपुलावर वॅगनआर कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात कराड येथील व्यापारी शहा दाम्पत्य गंभीर जखमी झाले असून त्यांची लहान मुले किरकोळ जखमी झाली. 

याबाबत भुईंज पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  सकाळी दहा वाजता पुण्याच्या बाजूने जाणारी वॅगनआर कार (नं. एमएच 50/ए 1700) चा चालकाचा मागचा टायर फुटल्याने कारने पुढे चाललेल्या   कंटेनर (क्र. युपी 14/ईटी 1620) ला धडक दिल्याने कराड येथील व्यापारी स्वागत अभय शहा वय 35 व त्यांच्या पत्नी प्रियांका स्वागत शहा (वय 30) हे गंभीर जखमी झाले. त्यांची दोन लहान मुले युगम व आगम हे किरकोळ जखमी झाले. 

शहा दाम्पत्यास सातारा येथील हॉस्पिटलमधून पुढील उपचारासाठी कृष्णा हॉस्पिटल कराड येथे दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताची माहिती मिळताच भुईंज सपोनि बाळासाहेब भरणे, हवालदार चंद्रकांत मुंगसे, हवालदार जगन्नाथ फरांदे, बरकडे यांनी घटनास्थळी जावून सहकार्य केले.