Sat, Sep 22, 2018 06:52होमपेज › Satara › नैराश्यातूनच संपवले आयुष्य

नैराश्यातूनच संपवले आयुष्य

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड  : प्रतिनिधी

रेठरे बुद्रूक येथील विराज हिंदुराव मोहिते यांनी नैराश्यातूनच आत्महत्या केल्याचे कराड तालुका पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. दरम्यान, ज्या रायफलचा वापर करत विराज मोहिते यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, ती रायफल पोलिसांनी जप्‍त केली आहे. विराज मोहिते हे स्व. यशवंतराव मोहिते आणि स्व. जयवंतराव भोसले यांचे पुतणे होते. तसेच मदनराव मोहिते, डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यासह डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्या कुटुंबीयांपैकी एक असलेल्या विराज मोहिते यांच्या आत्महत्येनंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

विराज यांनी नैराश्यातूनच आयुष्य संपवले असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. आर्थिक विवंचना अथवा अन्य कोणतेही कारण त्यांच्या आत्महत्येमागे नसल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाल्याचे तालुका पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, नातेवाईकांसह अन्य काही लोकांकडूनही विराज यांच्या आत्महत्येबद्दल माहिती घेतली जाणार असल्याचे सांगितले आहे.

गोळीचे झाले होते दोन भाग ...

विराज मोहिते यांनी रायफलमधून गोळी झाडून घेतल्यानंतर गोळीने गळा व हनवटीमधून कवटीचा वेध घेतला. मात्र यावेळी गोळीचे दोन भाग झाले होते, असे शवविच्छेदनावेळी समोर आले आहे. गोळीचे हे दोन्ही भागही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
 

 

tags ; Karad,news,Viraj,Hindurao, Mohite ,Depression, Suicide,


  •