Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Satara › कराडः नराधमांना फाशी देण्‍याची ग्रामस्थांची मागणी

कराडः नराधमांना फाशी देण्‍याची ग्रामस्थांची मागणी

Published On: Sep 02 2018 3:28PM | Last Updated: Sep 02 2018 3:27PMकराडः प्रतिनिधी

येणपे तालुका कराड येथील विवाहित महिलेवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी करत संबंधित महिलेच्या माहेरकडील रेठरे (वारणा) व परिसरातील ग्रामस्थांनी महिलांसह कराड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. 

यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांसह महिला व युवक मोर्चात सहभागी झाले होते. रेठरे गावच्या कन्येला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमांना फाशीची शिक्षा द्या, अशा स्वरूपाच्या घोषणा यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या युवकांसह युवतींनी दिल्या.