Sat, Jan 19, 2019 22:16होमपेज › Satara › कराड : मराठा भगिनींचा ठिय्या पाचव्या दिवशीही सुरूच

कराड : मराठा भगिनींचा ठिय्या पाचव्या दिवशीही सुरूच

Published On: Aug 05 2018 3:27PM | Last Updated: Aug 05 2018 3:15PMकराड : प्रतिनिधी 

कराड (जि. सातारा) येथील दत्त चौकात कराड तालुका मराठा समाज भगिनींसह बांधवांनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन सलग पाचव्या दिवशी सुरूच आहे. पाचव्या दिवशी मराठा भगिनींनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदवला.

मराठा समाजाला आरक्षण तसेच अन्य मागण्यांबाबत शासन उदासिन असल्याने राज्यभरात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. याच पार्श्वभूमीवर कराडात 1 आँगस्टपासून ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार मराठा भगिनींनी तसेच बांधवांनी केला आहे.