Sat, Apr 20, 2019 10:39होमपेज › Satara › शेतीच्या वादात खुरप्याने वार

शेतीच्या वादात खुरप्याने वार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड  :प्रतिनिधी 

कोडोली (ता. कराड) येथे किरकोळ कारणावरून सख्ख्या जावांची तुंबळ हाणामारी झाली. यात खुरप्याने वार केल्याने एका जावेवर कराड तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भारती शंकर पाटील (वय 50, रा. कोडोली) असे जखमीचे आहे. तर शुभदा संपत पाटील (रा. कोडोली, सध्या राहणार कोयना वसाहत) यांच्याविरूद्ध याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कोडोली येथे पाटील कुटुंबियांची एकत्रित शेत जमीन आहे.

या जमिनीबाबत शंकर पाटील व संपत पाटील यांच्यात जुना वाद आहे. या वादातीत जमिनीवर 25 फेब्रुवारीला शंकर पाटील यांच्या पत्नी भारती पाटील या उसाची लागण करत होत्या. यावेळी संपत पाटील यांच्या पत्नी शुभदा पाटील या लावलेली उसाची कांडी काढून टाकू लागल्या होत्या. त्यावेळी त्यांच्यात वादावादी होऊन शुभदा पाटील यांनी भारती पाटील यांच्यावर हातातील खुरप्याने वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी भारती पाटील यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शुभदा पाटील यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार अभिजीत देशमुख हे तपास करत आहेत.
 


  •