होमपेज › Satara › कचरा आता मंदिरातच जिरणार

कचरा आता मंदिरातच जिरणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड  : प्रतिनिधी 

स्थानिक स्वराज्य संस्थांना कचर्‍याचे व्यवस्थापन त्यांच्या पातळीवर करणे हे खूप जिकिरीचे काम झाले आहे. यातच नेहमी नवनवीन कल्पना पुढे येत असतात अशीच काहीशी नाविन्यपूर्ण कल्पना सोमवार पेठेतील नगरसेवक सुहास जगताप यांनी ग्रीनी द ग्रेट ह्या कचरा व्यवस्थापनात काम करणार्‍या कंपनीच्या मार्गदर्शनाखाली आणली आहे.  सोमवार पेठ या ठिकाणी मोठी 8 ते 10 मंदिर आहे दिवसाला एका मंदिरातून व  अंदाजे 3 ते 4 किलो निर्माल्य निघते.

आणि सण किंवा काही कार्यक्रम असल्यास तेच प्रमाण 10 ते 15 किलो पर्यंत असते. हे निर्माल्य घंटागाडीत किंवा बर्‍याचदा नदीत, विहिरीत टाकले जाते या मुळे जलप्रदूषण देखील होते हे होऊ नये या साठी नगरसेविका सौ. विद्या पावसकर सुहास जगताप यांनी मंदिराचे निर्माल्य मंदिरात जिरले जावे यासाठी मंदिरांना कंपोस्ट ड्रम देण्याचे ठरवले आहे. निर्माल्यपासून कंपोस्ट खत कसे बनवायचे याचे प्रात्यक्षिक ग्रीनी कंपनीचे अमोल गायकवाड हे दाखवून बचत गटाच्या महिलांना देखील प्रशिक्षण देणार आहेत.

या उपक्रमाची सुरवात रामनवमी दिवशी सोमवार पेठेतील राम मंदिरापासून  करण्यात आली आहे. येत्या काही दिवसात पूर्ण सोमवार पेठेतील मंदिरांत अशा प्रकारचे कंपोष्ट ड्रम व गांडूळखत किट बसवले जाणार आहेत. यासाठी इन्व्हायरो क्लबचे जालिंदर काशीद तसेच जेष्ठ नागरिक व स्वच्छता दूत  चंद्रकांत  जाधव यांचे  सहकार्य करणार आहेत. सदरील कार्यक्रमास राम मंदिर पुजारी महेश कुलकर्णी, राम मंदिर ट्रस्टीउमरानी, विद्याधर कुलकर्णी ग्रीनी टीमचे अमोल गायकवाड व सहकारी, संजय लादे,. मिलिंद शिंदे, रोहित आतवाडकर, मारुती काटरे व नागरिक उपस्थित होते.
 


  •