Mon, Jun 24, 2019 16:35होमपेज › Satara › कराड : पावसामुळे कबड्डी स्पर्धा पुढे ढकलली  (व्हिडिओ)

कराड : पावसामुळे कबड्डी स्पर्धा पुढे ढकलली  (व्हिडिओ)

Published On: Dec 05 2017 5:19PM | Last Updated: Dec 05 2017 5:19PM

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

येथील ६५ व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत पावसामुळे व्यत्यय आला आहे. स्पर्धेतील सांगली आणि कोल्हापूर यांच्यात चुरशीने सुरू असलेली पुरुष गटातील दुसरी सेमीफायनल अखेरच्या चार मिनिटात थांबवावी लागली. या सामन्यात सांगली केवळ एका गुणाने आघाडीवर असल्याने फायनलमध्ये कोण प्रवेश करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या अपूर्ण सेमी फायनलसह महिला व पुरुष गटातील दोन्ही फायनल 20 डिसेंबरला घेण्यात येणार आहेत.

शिवाजी स्टेडियमवर 65 व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत गतविजेत्या पुरुष व महिला गटातील गतविजेत्या पुणे संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर आशियाई चषक विजेत्या भारतीय संघाची कर्णधार अभिलाषा म्हात्रे, सायली जाधव यांच्या बहारदार खेळीमुळे मुंबई उपनगरने फायनलमध्ये प्रवेश मिळवला. त्यांनी कोल्हापूरच्या महिला संघाचा 24 गुणांनी धुव्वा उडववला. 

कराडमध्ये लिबर्टी मजूर मंडळाच्या मैदानावर हे सामने होणार आहेत. राज्य कबड्डी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास हा निर्णय घेतल्याचे असोशिएशनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय पाथ्रीकर यांनी सांगितले.