Fri, Jun 05, 2020 23:23होमपेज › Satara › कराडच्या गुळाची बाजारपेठ निम्म्याने घटली 

कराडच्या गुळाची बाजारपेठ निम्म्याने घटली 

Published On: Apr 03 2019 1:51AM | Last Updated: Apr 02 2019 10:28PM
उंडाळे :  वैभव पाटील 

महाराष्ट्रात सर्वात मोठी असणारी कराडच्या गुळाची बाजारपेठ शासनाच्या धोरणाने   व आर्थिक उलाढाल 50 टक्के पर्यंत घटल्याने    कराडची बाजारपेठ भविष्यात या धोरणाने मोडीत निघण्याची भिती  
निर्माण झाली आहे. 

शेतकर्‍यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेती उत्पन्न बाजार समितीची निर्मिती झाली. सहकारातून या बाजार समितीत शेतकर्‍यांच्या मालाला योग्य भाव मिळत   होता. पण गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा भाजप-सेना युती सरकारने बदलली यामध्ये शेतकर्‍यांनी आपल्या     मालाची कोठेही  बाजारपेठेत विक्री    करण्याची मुभा सरकारने दिली. यापूर्वी बाजार समित्यांमध्ये हा माल विक्रीला येत होता शासनाच्या धोरणाने शेतकर्‍याला जिथे जादा दर मिळेल तिथे हा शेतकरी माल विकू लागला व शासनाच्या या धोरणाने शेती उत्पन्न बाजार समितीत येणार्‍या मालाची आवक घटली.

याचा परिणाम कराड सह राज्यातील सर्व शेती उत्पन्न बाजार समिती वर झाला कराड येथे यापूर्वी येणार्‍या मालाच्या 50 टक्के गुळाची आवक यावर्षी म्हणजे 2018—19 या सालात झाली गतवर्षीच्या तुलनेत ही आवक 50 टक्के पेक्षा कमी आहे कराडची गुळाची बाजारपेठ देशात वरच्या स्थानावर होती कराड आणि कोल्हापूरचा गूळ हा राज्यातील सर्व कानाकोपर्‍यात विक्रीने पोहचत होता. याची खास वैशिष्ट्य म्हणजे कराडच्या गुळाला गोडी चांगली व कणीदार गुळ अशी ख्याती आहे.   पण अलीकडे रासायनिक खताचा प्रचंड वापर यामुळे कराडच्या गुळाची प्रतही कमी झाली आहे शिवाय गुळाला दर नसल्यामुळे गुर्‍हाळ घरांची संख्या ही सध्या बोटावर मोजण्याइतपतच राहिली आहे. एवढे सर्व असतानाही गुळाला दर नाही 

यामुळे शेतकर्‍यांचा ओढा आता गुळा कडून कमी होऊन ऊस साखर सहकारी साखर कारखान्याला देत आहेत. कराडच्या बाजारपेठेचा अंदाज घेता गतवर्षी 2017-2018   यावर्षी पाच लाख चार हजार 418 क्विंटल गुळाची आवक कराडच्या बाजारपेठेत झाली. तर यावर्षी  2018  -19 या वर्षात 61 हजार 400 क्विंटल गुळाची आवक झाली. गत वर्षी बाजार समितीला या गुळ व्यवसायातून 42 लाख 30 हजार 160 रुपये मार्च अखेर सेस जमा झाला होता. यावर्षी मार्चअखेर हा सेस 18 लाख 50 हजार 248 रुपये इतका जमला  आहे.  यावरून कराडच्या बाजारपेठेची गुळ व्यवसायाबद्दलची दाहकता दिसून येते या सर्व आकडेवारी व दराचा विषय घेता कराडची गुळाची बाजारपेठ भविष्यात मोडीत निघते की काय अशी भीती व्यापारी वर्गाला  पडली आहे. 

गुळाची किंमत निम्म्यावर आली

कराडमध्ये यापूर्वी गुळाचे दररोज विक्री सौदे निघत होते. यासाठी गुजरात सह दिल्ली, कलकत्ता, मद्रास या सर्व ठिकाणांहून व्यापारी कराडला येत होते.पण अलीकडे हेच  सौदे आठ दिवस होत नाहीत या मुळे व्यापारावर परिणाम झाला आहे. कराडला कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा काठावरील शाहुवाडी पन्हाळा या तालुक्यातून गुळाची आवक होत आहे. त्यामुळे कराडच्या बाजारपेठेत या गुळाला मोठी मागणी आहे या गुळाचा दर प्रति क्विंटल पाच ते सहा हजार रुपये आहे हे येथील वैशिष्ट्य पण कराडच्या गुळाची किंमत या तुलनेने निम्म्यावर  तीन ते साडेतीन  हजार रुपये  आहे.