Sat, Mar 23, 2019 18:33होमपेज › Satara › सातारा : कराडमधून श्रीनगरला निघालेला जवान बेपत्ता

सातारा : कराडमधून श्रीनगरला निघालेला जवान बेपत्ता

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी

श्रीनगर येथे भारतीय सैन्यदलात कार्यरत असणारा मुळचा जुळेवाडी (ता. कराड) येथील जवान बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. यासंबंधीची तक्रार जवानाच्या पत्नीने कराड शहर पोलिसात दिली आहे. अक्षय संजय सोमदे (वय 24)  असे बेपत्ता झालेल्या जवानाचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी अक्षय सोमदे हे भारतीय सैन्यदलात श्रीनगर येथे वायरलेस विभागात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी ते सुट्टीसाठी जुळेवाडी या आपल्या गावी आले होते. सुट्टीचा कालावधी संपल्यानंतर सेवेत हजर होण्यासाठी  30 मार्चला घरातून बाहेर पडले. नातेवाईकांनी त्यांना कोल्हापूर नाक्यावरील खासगी ट्रॅव्हल्समध्ये बसवले. दुसऱ्या दिवशी 31 मार्चला ते सकाळी मुंबई येथे पोहचले. त्यावेळी अक्षय सोमदे यांचा कुटूंबियांसोबत फोन झाला. 

मात्र यानंतर सोमदे यांचा कुटुंबियांशी संपर्क झाला नाही.  नातेवाईकांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा मोबाईल बंद असल्याचे समोर आले. बऱ्याच प्रयत्नानंतर सोमदे यांच्या संपर्क होवू न शकल्याने ते बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांची पत्नी सायली अक्षय सोमदे यांनी आज सोमवार (२ एप्रिल) कराड शहर पोलीस ठाण्यात दिली. 


  •