Thu, Jul 18, 2019 20:44होमपेज › Satara › कॅन्सर जनजागृती महारॅलीस प्रतिसाद

कॅन्सर जनजागृती महारॅलीस प्रतिसाद

Published On: Feb 06 2018 1:49AM | Last Updated: Feb 05 2018 10:00PMकराड : प्रतिनिधी 

कॅन्सर जागतिक जनजागृती अभियान महारॅलीचे आयोजन रोटरी क्लब ऑफ कराड चॅरिटेबल ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने करण्यात आले होते. या रॅलीत विविध संस्थांसह शाळा, महाविद्यालयांनी सहभागी होत प्रतिसाद दिला. या रॅलीमध्ये नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, कराड अर्बन बँक चेअरमन डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कृष्णा हॉस्पिटलचे डॉ. गुडूर, विविध संस्था, शाळा, कॉलेज, एनसीसी, विद्यार्थी, जिमखाना, ढोलपथक, स्केटींग ग्रुप, सायकल ग्रुप, डॉक्टर असोशिएशन, कॉटेज हॉस्पिटल, इनरव्हील क्लब, रोटरेक्ट क्लब, शाटर्डे क्लब, हास्य क्लब, सदाशिवगड ढोल पथक, कृष्णा नर्सिंग कॉलेज, दि कराड  केमीस्ट असोसिएशन या संस्था सहभागी झाल्या होत्या. 

150 फुट कॉलिग्राफी स्ट्रीट कॅलिग्राफी काढण्यात आली. कोल्हापूरचे दुकारेसर यांनी कॅलिग्राफी काढली. रोटरीचे प्रेसिडेंट किरण जाधव यांनी सर्वाचे स्वागत केले. रणजीत शेवाळे यांनी प्रास्तावना केली. प्रोजेक्ट चेअरमन डॉ. राहुल फासे, को. चेअरमन सागर जोशी, चंदू डांगे, शशांक पालकर, राजेश खराटे, राहूल पुरोहित, जयराम सचदेव, महेंद्र भोसले, अमोल पालेकर, वैभव जांभळे, सर्व रोटरी सदस्यांनी रॅलीसाठी परिश्रम घेतले. दरम्यान, उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. अशोक मोरे, डॉ. करिष्मा आतार, स्वाती शिंदे, एनटीडी विभागाचे डॉक्टर्स या रॅलीत सहभागी  झाले होते. यावेळी उपस्थितांकडून जनजागृतीची शपथ घेण्यात आली.