Thu, Sep 20, 2018 12:16होमपेज › Satara › ‘ब्रह्माकुमारीज’ पोस्टकार्डची  वंडर बुक ऑफ लंडनमध्ये नोंद 

ब्रह्माकुमारीज’ पोस्टकार्डची  वंडर बुक ऑफ लंडनमध्ये नोंद 

Published On: Feb 06 2018 1:51AM | Last Updated: Feb 05 2018 8:16PMकराड : प्रतिनिधी  

प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्‍वविद्यालयाच्या नागठाणे सेवा केंद्राने बनवलेल्या पोस्ट कार्डची जगातील सर्वात मोठे पोस्टकार्ड या विक्रमात लंडनच्या ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्डस् इंटरनॅशनल’ मध्ये नोंद झाली आहे.  खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी लंडनकडून प्राप्‍त झालेले प्रमाणपत्र नागठाणे ब्रह्माकुमारी केंद्राच्या संचालिका बी. के. सुवर्णादिदी  व 50 विश्‍वविक्रम करणारे  पाहिले भारतीय डॉ. दीपक हारके यांना प्रदान केले. पाली ता. कराड येथे खंडोबाच्या यात्रेत येणार्‍या भाविकांना शांती संदेश देण्यासाठी हे पोस्ट कार्ड बनवण्यात आले होते.