Wed, Sep 26, 2018 10:08होमपेज › Satara › दिव्याने दिवा लावला असता मूळचा दिवा उणा होत नाही : आप्पासाहेब खोत

दिव्याने दिवा लावला असता मूळचा दिवा उणा होत नाही : आप्पासाहेब खोत

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 10:50PMकराड : प्रतिनिधी

जीवन हे दिव्यासारखे तेवत रहावे. दिव्याने दिवा लावला म्हणून मुळचा दिवा उणा होत नाही, असे प्रतिपादन कथाकार आप्पासाहेब खोत यांनी केले.  येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात जिमखाना विभाग व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्‍त विद्यमाने वार्षिक पारितोषिक समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  खोत म्हणाले, कर्मवीरआण्णा, बापूजी साळुंखे यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करून बहुजन समाजातील मुलांसाठी शिक्षणाची मंदिरे उभी केली. समाजाला  सावली मिळावी म्हणून त्यांनी आपल्या डोक्यावर उन्हे  झेलली. 

प्राचार्या सौ. शुभांगी गावडे म्हणाल्या, आपल्या विचारांतून आपल्या व्यक्‍तिमत्वाचे मोजमाप होत असते. त्यामुळे आपले विचार उच्च असावेत. आज आपल्याला गरज आहे ती स्वत:ला सिद्ध करण्याची. स्वत:ची क्षमता व पात्रता वाढवली पाहिजे. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी व प्राध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. स्वागत उपप्राचार्य  डॉ. जे. ए. म्हेत्रे यांनी केले.  आभार प्रा. सौ. व्ही. जे. माने यांनी मानले. यावेळी प्रा. पी. एन. चौगुले, प्रा. डॉ. सतीश घाटगे, प्रा. सुरेश रजपूत, प्रा. दिलीपकुमार मोहिते तसेच प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.