कराड : प्रतिनिधी
कस्तुरी क्लब नेहमीच महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करत असते. शनिवार दि. 1 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता वेणूताई चव्हाण सभागृह, कराड येथे ‘अमर चाँदनी’ हा श्रीदेवीच्या अजरामर गाण्यांची मैफिल सर्व महिलांसाठी मोफत आयोजित केली आहे.
दै. पुढारी कस्तुरी क्लब व किशोरकुमार फॅन क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात नवीन सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. गेले दोन वर्षे दै.‘पुढारी’ च्या कस्तुरी क्लबच्यावतीने सदस्यांना भरभरून कार्यक्रमांचा खजिना, आकर्षक गिफ्ट, भरपूर लकी ड्रॉ देण्यात आले. यंदाची नवीन नोंदणी सुरू झाली असून यंदाही 550 रूपयांमध्ये कुकर तसेच 1 हजार रूपयांची हमखास गिफ्टस्, लकी ड्रॉची लयलूट, भरपूर डिस्काऊंट ऑफर्स व कार्यक्रमाची रेलचेल असून नवीन नोंदणी सुरू झाली असून महिलांनी त्वरीत संपर्क साधावयाचा आहे.
कार्यक्रम ओमकार सर्जिमेड व श्रीम सलून अॅन्ड स्पा यांच्या सहकार्याने होणार असून सर्व महिलांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी श्रुती कुलकर्णी मो. 8805023653 येथे संपर्क साधावा.मिनल ढापरे, अलाफिया मुल्ला यांचा सत्कार
कार्यक्रमामध्ये ‘कलर्स चॅनेल’च्या ‘डान्स दिवाने’ शोमध्ये आपल्या आकर्षक नृत्याने व वेगळ्या अदाकारीने पहिल्या 10 फेर्यांपर्यंत पोहोचणार्या कराडच्या प्रसिध्द कोरिओग्राफर मिनल ढापरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. अभिनेत्री माधुरी दिक्षीत परिक्षक असणार्या या शोमध्ये प. महाराष्ट्रातून मिनल ढापरे या एकमेव स्पर्धक होत्या. त्यांचा कस्तुरी क्लबच्यावतीने कार्यक्रमात सत्कार घेण्यात येणार आहे. तसेच रेठरे बुद्रुक येथील अलाफिया मुल्ला हिने ‘ फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत अंतिम स्थान पटकावल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात येणार आहे.
नोंदणी करताना गोरीला ग्लास भेट
कार्यक्रमस्थळी शनिवार दि. 1 रोजी नोंदणी करणार्या सदस्यांना मोबाईल स्क्वेअरकडून मोबाईल गोरीला ग्लास पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
लकी ड्रॉमध्ये विजेत्यांना मिळणार आकर्षक गिफ्ट
कस्तुरी क्लबचे सभासद झाल्यानंतर वर्षभरात विविध लकी ड्रॉमधून विजेत्या सभासदांना आकर्षक गिफ्टस् मिळणार आहेत. यामध्ये वेदांत ड्रायफ्रुटस् 12 महिलांना (प्रत्येकी 1 किलो) मिक्स ड्रायफ्रुटस्, सारस लेडिज शॉपी डिझायनर ब्लाऊज (10 लकी ड्रॉ), मिरा टेलर्स अॅन्ड ड्रेस मटेरियअल्स 15 ड्रेस मटेरिअल, टप्पर वेअर (10 लकी ड्रॉ), ऑल इज वेल हस्ताक्षर कोर्स फ्री (3 लकी ड्रॉ), पालकर ज्वेलर्स देवदास दिवा (5 लकी ड्रॉ), संजीवनी वेलनेस बॉडी मसाज व स्टिम (10 लकी ड्रॉ), कृष्णा भांडी बाझार (1हजार रूपयांची गिफ्ट व्हॉऊचर) 15 लकी ड्रॉ, कृष्णा एंटरप्रायजेस केंट वॉटर प्युरिफायर 5 लकी ड्रॉ, धनश्री लेडिज वेअर रेडिमेड कुर्तीज (5 लकी ड्रॉ), जामदार आयुर्वेद 650 रू. चे गिफ्ट हँम्पर असे 10 लकी ड्रॉ द्वारे सदस्यांना गिफ्टस् मिळणार आहेत.