Thu, Nov 15, 2018 09:33होमपेज › Satara › कामेरी वाळू उपसाप्रकरणी आठ जण ताब्यात 

कामेरी वाळू उपसाप्रकरणी आठ जण ताब्यात 

Published On: Jun 08 2018 1:24AM | Last Updated: Jun 07 2018 11:28PMवेणेगाव : वार्ताहर 

सातारा तालुक्यातील कामेरी येथील वाळू उपसाप्रकरणी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे अवैध वाळू उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. राहुल राजाराम घोलप (वय 26, रा. फत्यापूर ता. सातारा), प्रकाश आनंदा सोनकांबळे (वय 30, रा. कवटा ता. कंधार, जि. नांदेड, सध्या रा. अंगापूर, ता. सातारा), सोमनाथ हणमंत घाडगे (वय 36, रा. कामेरी), रविराज नवनाथ घाडगे (वय 28, रा. कामेरी), नितीन दिलीप चव्हाण (वय 28, रा. कालगाव, ता. कराड), संदीप सुगंधराव घाडगे (वय 32, रा. कामेरी), संतोष हरी लोखंडे (वय 35, रा. कामेरी) व अमोल मच्छिंद्र घाडगे (रा. कामेरी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

या कारवाईत ट्रॅक्टर, एक जेसीबी, यारी ही वाहनेही पोलिसांनी जप्त केली आहेत. याबाबतची फिर्याद कामेरी येथील तलाठी कैलास बाबुराव म्हैसनवाड यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास सपोनि संतोष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार रामचंद्र फरांदे करत आहेत.