Sun, Mar 24, 2019 16:47होमपेज › Satara › सातार्‍यात ज्योतिर्मय महोत्सव 

सातार्‍यात ज्योतिर्मय महोत्सव 

Published On: Dec 04 2017 1:34AM | Last Updated: Dec 03 2017 10:11PM

बुकमार्क करा

सातारा : प्रतिनिधी

बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तुंंना बाजारपेठ मिळावी, यासाठी ज्योतिर्मय फौंडेशनच्यावतीने दि. 8 ते 12 डिसेंबरअखेर जिल्हा परिषद मैदानावर ‘ज्योतिर्मय महोत्सव 2017’चे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुवर्णादेवी पाटील यांनी पत्रकार  परिषदेत दिली.

दि. 8 रोजी महोत्सवाचे उद्घाटन राजमाता श्री.छ. कल्पनाराजे भोसले, विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. 9 रोजी सायंकाळी 6 वाजता स्वर संध्या हा जुन्या मराठी व हिंदी गाण्याचा कार्यक्रम, दि. 10 रोजी सायंकाळी 5 वाजता सिनेकलाकार सौ. श्‍वेता शिंदे, उद्योजिका सौ. श्रध्दा पवार, सेल टॅक्स ऑफिसर सौ. निलम जाधव, नृत्यांगना सौ. माधुरी पवार यांचा सत्कार महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, माणदेशी फौंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी बचत गटातील 10 महिलांना उद्योजिका पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी लावण्यांचा  कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. 11 रोजी सायंकाळी 5 वाजता महिलांसाठी ‘होम मिनीस्टर’ व बक्षीस समारंभ कार्यक्रम भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा निताताई केळकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. दि. 12 रोजी सायंकाळी 5 वाजता  मुलांसाठी गेम शोचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवात बचतगटातील महिलांचे सुमारे 175 स्टॉल्स  आहेत. जिल्हा बँक, कृषी व जलसंधारण कामांंचा स्टॉल, निर्भया, मोबाईल अ‍ॅप, गाड्या, खाद्यपदार्थ यासह विविध स्टॉल्स यामध्ये असणार आहेत. तसेच महिलांना दुचाकीचे मोफत प्रशिक्षण व लायसन काढून देण्यात येणार आहे. बालगोपाळांसाठी डिझनी लॅन्डचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुवर्णादेवी पाटील यांनी सांगितले. 

यावेळी सौ. स्मिता शिंगटे, सौ.निर्मला पाटील, अ‍ॅड. अंजुम मणेर, सौ. सिमा भाटीया, सौ. राजश्री दोशी, दिप्ती पवार, सईदा नदाफ, रेणुका शेटे, मल्लिका पुजारी, निलम राजपूत, राधिका पाटील, निलम राठोड उपस्थित होत्या.