होमपेज › Satara › माजी जि.प.अध्यक्षा ज्योती जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

माजी जि.प.अध्यक्षा ज्योती जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Published On: Jan 20 2018 1:42AM | Last Updated: Jan 19 2018 10:27PMभिलार : वार्ताहर

महाबळेश्‍वर तालुक्यात शेती विषयक संशोधन केंद्र उभारून शेतकर्‍यांचा स्तर उंचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. मकरंद पाटील यांनी टेकवली येथील शेतकरी मेळव्यात केले. दरम्यान, माजी जि. प. अध्यक्षा ज्योती जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याबद्दल त्यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. 

माचुतर विभागातील गावांचा शेतकरी मेळावा टेकवली, ता. महाबळेश्‍वरमध्ये आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब भिलारे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, पं. स. सदस्य संजय गायकवाड, नगरसेवक किसनशेठ शिंदे, गणपत पारठे, सुभाष कदम, बाबूराव संकपाळ, प्रवीण भिलारे आदी उपस्थित होते

आ. पाटील पुढे म्हणाले, सरकारने हमी भावाचे पोकळ आश्‍वासन दिल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. आता विचारपूर्वक काम करून व्यवसाय वाढवावा. दरम्यान, ज्योती जाधव यांनी  स्वगृही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यांचा आ. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बाळासाहेब भिलारे व संजय गायकवाड यांची भाषणे झाली. गेणू कदम, सुरेश झाडे यांनी स्वागत केले. संजय कदम यांनी आभार मानले.