Sat, Mar 23, 2019 01:59होमपेज › Satara › पारधी समाजाला न्याय द्या

पारधी समाजाला न्याय द्या

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कराड : प्रतिनिधी 

आजवरच्या राज्यकर्त्यांनी पारधी समाजाच्या उन्नतीसाठी चांगल्या योजना आखल्या. मात्र या योजनांची अंमलबजावणीच केली नाही. त्यामुळे आता भाजपा सरकारने तरी ठोस कृती आराखडा तयार करून पारधी समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी पारधी मुक्ती आंदोलन समितीचे अध्यक्ष प्रकाश वायदंडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी स्व. यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून कराड विमानतळावरून वाळव्याकडे रवाना झाले. त्यावेळी वायदंडे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देत त्यांची भेट घेतली. यावेळी अनिल कांबळे, कैलास पवार, चान्सलर काळे हेही उपस्थित होते. निवेदन दिल्यानंतर वायदंडे यांनी पारधी समाजाच्या समस्या त्यांचे गार्‍हाणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यापुढे मांडले.

तसेच जलयुक्त शिवार या योजनेद्वारे दुष्काळी भागाला शासन ज्याप्रमाणे न्याय देत आहे, त्याचप्रमाणे ठोस कृती आराखडा तयार करून पारधी समाजाला न्याय देण्याची मागणी वायदंडे यांनी केली. याप्रश्‍नी स्वत: लक्ष घालणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी वायदंडे यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांना दिली आहे.